जम्मू-काश्मीर: दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक सुरु

    24-Apr-2018
Total Views | 13
 
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील त्राल भागात आज सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात आज गोळीबार झाल्याची बातमी सध्या मिळत आहे. या गोळीबारात अद्याप कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र अजून देखील सुरक्षा रक्षक या गोळीबाराला चोख प्रतिउत्तर देत आहेत. त्राल या भागात २ दहशतवादी लपले असल्याचे सध्या सांगितले जात आहे. 
 
 
 
 
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधीलच त्रालच्या सीर भागात जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला होता. सुरक्षा रक्षकांनी देखील या हल्ल्याला चोख प्रतिउत्तर दिले होते. सेनेची गाडी त्राल भागामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना दहशतवाद्यांनी या गाडीत असलेल्या तुकडीवर हल्ला चढविला होता.
 
 
 
तर काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि शोपियान भागात सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती लागले होते. सुरक्षा रक्षकांनी सात दहशतवाद्यांना ठार केले असून एका दहशतवाद्याला जिवंत पकडले होते. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि शोपियान भागात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांना हे यश मिळाले होते. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121