अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्काच्या निर्णयामुळे, जगभरात व्यापारयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकी बँका लंडन येथून अब्जावधी डॉलर्स मूल्याचे सोने, अमेरिकेत नेत आहेत. येणार्या काळात आर्थिक संकट तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यातून मिळत आहेत.
Read More
अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा हिंदी चित्रपटसृष्टीत मोठा चाहता वर्ग आहे.काही महिन्यांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून तिचं नाव दुआ असं आहे. दरम्यान, आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दीपिका चाहत्यांसमोर आली असून तिने पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याच्या बंगळूरमधील गाण्याच्या कॉन्सर्टला हजेरी लावून धमाल केली. सध्या दीपिकाचा आनंदीत होत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचे देशविदेशात म्यूझिक कॉन्सर्ट होत असतात. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या त्याच्या कॉन्सर्टमधला गोंधळ ताजा होताच आता आणखी एक नवीन गोंधळ समोर आला आहे. नुकताच जयपूरमध्ये त्याचा कॉन्सर्ट मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कॉन्सर्टला आलेल्या चाहत्यांना मोठा फटका बसला. दिलजीतच्या कॉन्सर्टच्या गर्दीत चोरांनी चांगलाच हात साफ करुन घेतला. कॉन्सर्टनंतर अनेक चाहत्यांचे फोन चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली.
जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये गायक दिलजीत दोसांझ याचा दोन दिवसीय कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. कॉन्सर्ट झाल्यानंतर स्टेडियमची अवस्था उपस्थित लोकांनी गलिच्छ केली असून तिथेच दारुच्या बाटल्या, कचरा आणि प्रचंड घाण केली आहे. इतकेच नव्हे तर तेथे अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या अॅथलेट्सच्या सामानांची देखील मोडतोड करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन दिवसी कॉन्सर्टसाठी ७० हजारांपेक्षा जास्त लोकं तेथे हजर होते.
अयोध्येतेच प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आणि तिथे आता रामलल्लाचे भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मंदिर अस्तित्वात असल्याचा उल्लेख आपल्या निर्णयात केला आहे. आता एनसीईआरटीनेही त्यानुसार अभ्यासक्रमात बदलला आहे. बाबरीचे वर्णन आता 'मशीद' ऐवजी 'तीन घुमट असलेला ढाचा' असे करण्यात आले आहे. बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात हा बदल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीचा भाग म्हणून राज्यानेही अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला. मनुस्मृती आणि इतर काही विषयांमुळे वादात सापडलेल्या या आरखड्यातील अनेक बाबींवर सखोल चर्चा झालीच नाही. त्यामुळेच हा आरखडा नेमके काय सांगतो आणि सुरु असलेला वाद याविषयी या लेखातून आढावा घेतला आहे...
‘समरसता साहित्य परिषद’ पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे दि. 5 मे रोजी स्व. विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक मैफिल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या आगळ्या वेगळ्या काव्यस्पर्धेचा या लेखात घेतलेला मागोवा...
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल अँड रिसर्च अर्थात एनसीईआरटीने इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या आठव्या धड्यामध्ये बदल केला आहे. 'भारतीय राजकारण : नवीन अध्याय' या शीर्षकाच्या या धड्यामध्ये सध्याच्या भारतीय राजकारणात नवीन संदर्भ जोडले गेले आहेत. तसेच बाबरी पतन, गुजरात दंगल आणि हिंदुत्वाचे राजकारण या आधीच्या प्रकरणांमध्ये काही एकांगी संदर्भ काढून टाकले आहेत.
गायन, वाद्य यंत्रांचा आवाज अन् यावर थिरकणारा सहा हजार लोकांचा प्रेक्षक वर्ग. हे दृश्य होतं, मॉस्कोपासून अवघ्या २० किमी दूर असलेल्या क्रोकस सिटी हॉलचं. सर्वकाही सुरळीत चालू असताना अचानक क्रोकस सिटी हॉलमध्ये आगीचा आगडोंब उसळला. या आगीपासून वाचण्यासाठी हॉलमध्ये बसलेले लोकं बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतात. त्याचवेळी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला जातो. आपला जीव वाचवण्यासाठी लोकं मिळेल तो आसरा घेण्याचा प्रयत्न करतात. पण, चार हल्लेखोरांच्या बंदुकीपुढे त्यांचा निभाव लागणं कठीण. या हल्लेखोरांच्या गोळीबारात आतापर्य
भारतीय मनोरंजनसृष्टीतील सदाबहार गायिका म्हणजे पद्मभूषण आशाताई भोसले (Asha Bhosle). ५०-६० च्या दशकांपासून श्रोत्यांना केवळ हिंदीच नाही तर अनेक भाषांमधून सुमधूर गाणी ऐकवणाऱ्या आशातीई वयाच्या नव्वदीत देखील प्रेक्षकांचे गाऊन मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. आशाताईंच्या नव्वदीतही त्यांच्या सुरांची जादु श्रोत्यांना लाईव्ह ऐकण्याची संधी लवकरच मिळणार आहे. 'आशा @ 90: वो फिर नहीं आते' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पुन्हा एकदा श्रोत्यांना आशाताईंच्या आवाजाच्या दुनियेत हरवून जाण्याची संधी मिळणार आहे.
जगात कुराण शरीफपेक्षा मोठा ग्रंथ नाही. त्यामुळे एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा, असे उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी म्हटले आहे. शालेय अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारताचा समावेश करण्याला विरोध करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
लवकरच शाळेत विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारताचे धडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र समितीने ही शिफारस केली आहे. तसेच शाळेतील वर्गखोल्यांमध्ये भिंतीवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याचीही शिफारस समितीकडून करण्यात आली आहे.
पौराणिक महाकाव्य रामायण-महाभारत शाळांमध्ये शिकविण्यासाठी नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात 'एनसीईआरटी'कडून प्रयत्न सुरू असल्याचे सुतोवाच मिळत आहेत. यासंदर्भात एनसीईआरटीच्या पॅनेलकडून सुचविण्यात येत आहे. एनसीईआरटीच्या मते, रामायण-महाभारत यांसारख्या महाकाव्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा यासाठी हालचाली सुरू आहेत.
रामायण-महाभारत या दोन महान आर्ष महाकाव्यांचा समावेश इतिहासाच्या अभ्यासक्रमात करावा, अशी शिफारस नुकतीच ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (एनसीईआरटी) समितीने केली. जीवनमूल्ये, नैतिकतेचे महत्त्व देणारे हे ग्रंथ. धर्म आणि कर्म यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ही महाकाव्ये न्याय तसेच शांततेची शिकवणही देतात. एक आदर्श नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना घडवण्यात, त्यांची मोलाची भूमिका असेल, म्हणून ही शिफारस महत्त्वाची ठरावी.
’एनसीईआरटी’ अर्थात ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग’ने आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भावी पिढीला भारताचे नाव समजावे आणि ते जाणून घेता यावे, या भावनेने अशी शिफारस करण्यात आली आहे.
पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असून, ‘अपार आयडी’ या नावाने हे ओळखपत्र ओळखले जाईल. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीचे संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड यात संग्रहित केले जाईल. असा हा शैक्षणिक आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणारा निर्णय सर्वस्वी कौतुकास्पदच!
‘जी 20’ शिखर परिषदेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक नेत्यांसमोर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असाच आपल्या मातृभूमीचा केलेला उल्लेख सर्वस्वी सुखावणारा होताच. आता पाठ्यपुस्तकांतूनही ‘भारत’ हेच नाव वापरण्यात यावे, अशी शिफारस ‘एनसीईआरटी’च्या समितीने केली आहे. वसाहतवादी मानसिकतेचे हे ओझे आजच्या आणि पुढील पिढीच्या खांद्यावर न देण्यासाठी केलेली ही शिफारस सर्वस्वी कौतुकास्पदच!
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) त्यांच्या पुढील पुस्तकांच्या संचामध्ये 'INDIA' ऐवजी 'भारत' छापणार आहे. पॅनेलचा हा प्रस्ताव सदस्यांनी एकमताने मान्य केला आहे. यासोबतच इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ‘हिंदू विजया'ला प्राधान्य देण्याची शिफारस समितीने केली आहे.एनसीईआरटीच्या नवीन पुस्तकांच्या नावात बदल केला जाईल, असे पॅनेल सदस्यांपैकी एक सीआय इस्साक यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि आता तो मान्य करण्यात आल्याचे इस्साक यांनी सांगितले.
एनसीईआरटीने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’चे ‘भारत’ करावे अशी शिफारस केली आहे. मात्र, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी एनसीईआरटी आपल्या अभ्यासक्रमात बदल करत आहे. त्याअंतर्गत अभ्यासक्रमात अनेक सुधारणाही केल्या जात आहेत. अभ्यासक्रमातील बदलांबाबत १९ सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवज ‘भारत’ असा शब्दप्रयोग करण्याची शिफारस केली आहे. समितीमध्ये आयसीएचआरचे अध्यक्ष रघुवेंद्र तंवर, जेएनयूमधील प्राध्
‘चांद्रयान’ मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेत देवी-देवतांच्या रथापासून रावणाच्या पुष्पक विमानापर्यंतचा उल्लेख करण्यात आला आहे. वेद आणि विज्ञान यांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह असाच आहे. भारतीय शिक्षण आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
काल संध्याकाळी राम मंदीर, अलिबाग येथे 'शेवटचं पान' ही स्वरचित कवितांची मैफिल संपन्न झाली. शिवानी, प्रतिक व अनिकेत या अलिबागमधीलच काही स्थानिक तरुणांनी ही मैफिल आयोजित केली होती. 'कलेला वाव देणारं, मनाचा ठाव घेणारं - तुमच्या आमच्या वहीचं, सर्वात खास, शेवटचं पान' हे शीर्षक असलेलं आकर्षक पोस्टर रसिकजनांचं लक्ष वेधून घेत होतं. तरुणांनी या मैफिलीचं आयोजन केल्यामुळे प्रेम, पाऊस, रात्र, समुद्र अशा सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या कविता सादर करण्यात आला. शिवाने दामले यांच्या एका कवितेला तर वन्स-मोर देखील मिळाला.
संगीतभुषण पं. राम मराठे जन्मशताब्दीनिमित्त रविवारी शास्त्रीय संगीताची सुरेल मैफल ठाण्यात होणार आहे. ठाण्याची ग्रामदेवता समजल्या जाणा-या घंटाळी देवीच्या नवरात्रौत्सवात हिंदू जागृती न्यास संचालित हिंदू जागृती सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या सहकार्याने पं. राम मराठे फाउंडेशनच्या वतीने सहयोग मंदिर सभागृहात रात्री ८.३० वाजता होणाऱ्या या मैफलीत अनेक नामवंत कलाकार सहभागी होणार असून ठाणेकर संगीतप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे. यानिमित्ताने पं. राम मराठे यांच्या सांगितीक कारकिर्दीला उजाळा मिळणार आहे.
राजकीय स्थिरता असेल तर धोरणकर्त्यांना व्यापक देशहिताची धोरणे राबवता येतात. तसेच ही स्थिरता गुंतवणुकीला आकर्षित करणारी ठरते. नव्याने झालेली गुंतवणूक रोजगार आणि आर्थिक वाढीला चालना देते. स्थिर सरकार असेल तर ते उद्योगव्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करते. भारत आज पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो. तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा भारताचा मार्गही स्थिरताच मोकळा करणार आहे.
पुढच्या काळातल्या घरोघरच्या बनूंना असा प्रश्न पडू नये आणि त्यांच्या भावांना त्याचं उत्तर देत बसावं लागू नये म्हणून ‘नॅशनल काऊंसिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग’ उर्फ ’एनसीईआरटी’ने राष्ट्रीय युद्धस्मारक म्हणजे काय नि ते कसं, कुठे, केव्हा उभारलं गेलं, या सगळ्या गोष्टींचा समावेश इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमातच करून टाकला आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवर आता विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तयार करणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची टीम तयार करण्यात येणार असून या १९ जणांच्या टीमद्वारे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. एनसीईआरटीने १९ दिग्गज व्यक्तिमत्त्वांवर जबाबदारी सोपवली आहे.
‘विज्ञान भारती’ हे एक अखिल भारतीय संघटन एक स्वदेशी विज्ञान आंदोलन आहे. आपल्या देशातील प्राचीन ते अर्वाचीन विज्ञानाबद्दल जागृती निर्माण करून आपल्या देशाच्या उन्नतीसाठी वैज्ञानिकांना एकत्र आणून नवनवीन क्षेत्रात काम उभे करणे या उद्देशाने हे आंदोलन गेली ३१ वर्षे चालू आहे. विज्ञान भारतीच्या ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ या उपक्रमाचा या लेखात मागोवा घेण्यात आला आहे.
असे म्हणतात की, शत्रूबद्दलचे अज्ञान किंवा अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असते; म्हणूनच आपण महाराष्ट्रभूमीचाच नव्हे, तर आमच्या मातृभूमीचा शत्रू असणार्या औरंगजेबाचा खरा चेहरा ओळखण्याची गरज आहे. सध्या महाराष्ट्रात मराठ्यांचा इतिहास बिघडवण्याचे मोठे षड्यंत्र सुरू आहे. वेगवेगळ्या गोंडस नावाखाली औरंगजेबाचा उदो उदो करण्याचा डाव मांडला जात आहे. त्यानिमित्ताने क्रूरकर्मा औरंगजेबाचा खुन्शी चेहरा आणि औरंग्याचे समर्थन करुन बुद्धिभ्रम निर्माण करणार्या नेतेमंडळींचाही बुरखा फाडण्यासाठीचा हा लेखप्रपंच...
एनसीईआरटी अभ्यासक्रमास लक्ष्य करून त्याद्वारे नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या कामात अडथळे आणले जात आहेत.
भारतीय शिक्षण व्यवस्थेला नख लावण्याचे काम मॅकॉलेने केले. त्याने एकोणिसाव्या शतकात आणलेली शिक्षण पद्धतीच आपण आजही कायम ठेवलेली आहे. गुलामगिरीतून बाहेर पडायचे असेल, तर या पद्धतीत बदल केला पाहिजे, हे ओळखून केंद्र सरकार शिक्षण व्यवस्थेत बदल करत आहे. पाठ्यपुस्तकांतून गौरवशाली भारतीय संस्कृती लिहिली जात आहे. म्हणूनच पुरोगामी संतप्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याविषयी अपमानजनक टिप्पणी केल्यामुळे नॅशनल हेराल्डच्या संपादिका चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य लूटमार करणारे होते आणि ते महिलांचा बलात्कार करायचे अशी टिप्पणी सुजाता आनंदन यांनी ट्विटरवरून केली होती. त्यांच्या या ट्विटची दखल घेत भाजप आमदार नितेश राणे यांनी या विरोधात पोलीस एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. यावरून सांताक्रुज पोलिसांनी राणेंच्या तक्रारीची दखल घेत सुजाता आनंदन आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक
गेल्या दशकात भारतात ज्या आमूलाग्र सुधारणा झपाट्याने झालेल्या दिसतात, त्यात प्रत्येक भारतीयाने दिलेले योगदान अतिशय बहुमूल्य आहे, मग ती ‘डिजिटल’ क्षेत्रातील क्रांती असो की इतर देशांचा भारताकडे बघण्याचा (आधीच्या तुलनेत) आताचा सकारात्मक दृष्टिकोन...! यातून भारताची वाटचाल दमदार होताना दिसते, त्यामुळे ‘मोदी क्वश्चेन’सारख्या निर्बुद्ध मुद्यांना सामान्य जनता भिक घालत नाही हेदेखील अधोरेखित करणे गरजेचे वाटते.
अनिश्चित परिस्थिती जेव्हा मानवाला जगण्यासाठीच आव्हान करते तेव्हा खर्या अर्थाने या पृथ्वीतलावर जगण्याला एक नवीन दिशा मिळते. कधी ती श्रीकृष्णाने रचलेली भगवद्गीता असते, तर कधी ती मानवनिर्मित जीवन संंरक्षित करणारी लस असते. याचाच स्पष्ट अर्थ असा की, अनिश्चितता जितकी वाटते तितकी नकारात्मक नाही.
डिजिटल काळात संगीतकार ‘ऑनलाईन लाईव्ह इन कॉन्सर्ट’मधून प्रेक्षकांना करणार मंत्रमुग्ध!
इंग्लंडची पॉपस्टार दुआ लिपाचे आज भारतात आगमन झाले. मुंबईत होणाऱ्या ‘वनप्लस म्युझिक फेस्टिवल’ या म्युझिक कॉन्सर्टसाठी ती भारत दौऱ्यावर आहे.
अमेरिकन पॉपस्टार केटी पेरी सध्या एका म्युझिक कॉन्सर्टसाठी भारत दौऱ्यावर आहे. मुंबईमध्ये होणाऱ्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ती परफॉर्म करणार आहे.
नीलिमा दाते...
शुभश्रुती आर्ट्स आणि शामांग एंटरटेनमेंट यांच्या समन्वयाने येत्या शुक्रवारी म्हणजेच २ ऑगस्ट २०१९ रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे नोर्थनएंड व इनर व्हील क्लब ऑफ ठाणे नोर्थनएंड यांच्यातर्फे हिंदी सिनेसृष्टीतील सुमधुर आणि सुश्राव्य अशा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मराठी पॉप गाण्यांचा सूर सातासमुद्रापार वाजणार आहे. ‘सुरेल क्रिएशन’ व ‘३एएमबीझ’ यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेत ‘अवधूत गुप्ते- स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉनसर्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. येथील मराठी जणांना अस्सल मराठी मातीतल्या गाण्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभांच्या पोटनिवडणुकांमध्ये आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमिवर निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेपोटी शेअर बाजार आता ठराविक मर्यादे (रेंजबाऊंड)तच राहण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
देशांतर्गत शेअर बाजारासाठी राजकीय अनिश्चितता ही सर्वात मोठी चिंतेची बाब ठरणारी आहे. त्याला अमेरिकेने सुरु केलेल्या व्यापार युद्धा(ट्रेड वॉर)ची जोड मिळाली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे.