रामायण-महाभारत नाही, तर अभ्यासक्रमात कुराणचा समावेश करा! सपा खासदाराची मागणी
27-Nov-2023
Total Views | 50
मुंबई : जगात कुराण शरीफपेक्षा मोठा ग्रंथ नाही. त्यामुळे एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा, असे उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी म्हटले आहे. शालेय अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारताचा समावेश करण्याला विरोध करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
नुकताच रामायण-महाभारत या महाकाव्यांचा शालेय इतिहासाच्या अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी शिफारस ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (एनसीईआरटी) समितीने केली आहे. परंतू, शफीकुर रहमान बुर्के यांना या विषयावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "जर एनसीईआरटीला अभ्यासक्रमात धार्मिक पुस्तकांचा समावेश करायचा असेल तर रामायण-महाभारताऐवजी कुराणचा समावेश करावा. कारण कुराणपेक्षा चांगले कोणतेही पुस्तक नाही."
ते पुढे म्हणाले की, "जगात कुराणपेक्षा मोठे पुस्तक नाही. हे पुस्तक आपण किंवा देशातील जनतेने लिहिलेले नाही तर अल्लाहने लिहिले आहे. त्याचा एनसीईआरटीमध्ये समावेश करावा. तसेच जगातील कोणत्याही शिक्षणात देशभक्तीची कमतरता नाही," असेही ते म्हणाले.