नवी दिल्ली : पौराणिक महाकाव्य रामायण-महाभारत शाळांमध्ये शिकविण्यासाठी नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात 'एनसीईआरटी'कडून प्रयत्न सुरू असल्याचे सुतोवाच मिळत आहेत. यासंदर्भात एनसीईआरटीच्या पॅनेलकडून सुचविण्यात येत आहे. एनसीईआरटीच्या मते, रामायण-महाभारत यांसारख्या महाकाव्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा यासाठी हालचाली सुरू आहेत.
दरम्यान, एनसीईआरटी पॅनेलने इतिहासाचा अभ्यासक्रम चार कालखंडात विभागून शिकवण्याची शिफारस केली असून शास्त्रीय कालखंड, मध्ययुगीन काळ, ब्रिटिश काळ आणि आधुनिक भारत असे हे चार कालखंड असणार आहेत. तसेच, या उच्चस्तरीय समितीच्या सामाजिक शास्त्र समितीने दिलेल्या या शिफारशी मंजूर झाल्या, तर तो दिवस दूर नाही जेव्हा मुलांना मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आणि गीता याविषयीचे ज्ञान केवळ घरीच नव्हे तर शालेय पुस्तकांमध्येही वाचायला मिळेल.