एक दोन नव्हे, पाकिस्तानच्या ७० चौक्या उध्वस्त! बीएसएफने पुराव्यासकट केली पोलखोल

    28-May-2025
Total Views | 32
 
BSF probes with evidence
 
नवी दिल्ली : भारतीय सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफने ऑपरेशन सिंदूरचा एक नवा व्हिडिओ प्रसिध्द केला आहे. ज्यात भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी तळ कसे अचूक लक्ष्य करून हल्ले केले हे दाखवले आहे. पाकिस्तानच्या या तळांद्वारे दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत शिरकावासाठी पाठविण्यात येणार होते. हा कट भारतीय सीमा सुरक्षा दलाने उधळून लावला आहे.
 
बीएसएफने प्रसिध्द केलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे दहशतवादी तळ कसे नष्ट केले जात आहे हे स्पष्ट दिसत आहेत. या व्हिडिओत बीएसएफने पाकिस्तानवर केलेल्या स्फोटांच्या वेगवेगळ्या क्लिप्स दाखवल्या आहेत. ज्यामध्ये भारतीय सैनिक पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर गोळीबार करत उद्ध्वस्त करताना दिसून येत आहेत. याच व्हिडिओमध्ये बीएसएफकडून पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यासुद्धा उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.
 
मंगळवार २७ मे रोजी बीएसएफचे आयजी शशांक आनंद म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान, भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या ७०हून अधिक दहशतवादी चौक्या आणि लाँचपॅड उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय सीमा सुरक्षा दलाने अखनूर, सांबा लोणी, मस्तपूर , छाबरा यांसह आरएसपुरा सेक्टरमधील अनेक पाकिस्तानी लाँचपॅड व दहशतवाद्यांचा अड्डा असणार्‍या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
 
दरम्यान आयजी आनंद पुढे म्हणाले की, ''बीएसएफने पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या नावावर सीमा चौक्यांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव भारत सरकारला दिला आहे व सांबा चौकीला आता 'सिंदूर' असे नाव देण्यात येईल.''
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121