डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगणार "म्युझिकली युअर्स" कार्यक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2019
Total Views |


 


शुभश्रुती आर्ट्स आणि शामांग एंटरटेनमेंट यांच्या समन्वयाने येत्या शुक्रवारी म्हणजेच २ ऑगस्ट २०१९ रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे नोर्थनएंड व इनर व्हील क्लब ऑफ ठाणे नोर्थनएंड यांच्यातर्फे हिंदी सिनेसृष्टीतील सुमधुर आणि सुश्राव्य अशा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. "म्युझिकली युअर्स" असे या कार्यक्रमाचे नाव आहे.

ठाण्यातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रात्री ८ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. " म्युझिकली युअर्स" या कार्यक्रमामध्ये मधुरा देशपांडे व अवधूत रेगे हे नामांकित गायक स्वतःची कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीमधून जो निधी संकलित केला जाईल तो निशी हा मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या ठाण्यातीलच एका संस्थेला देण्यात येणार आहे. तेव्हा या कार्यक्रमाला जाऊन सुमधुर गाणी ऐकतानाच एक सत्कृत्य केल्याचा देखील आनंद तुम्हाला या निमित्ताने नक्कीच मिळू शकेल.

 
@@AUTHORINFO_V1@@