शाळेतील विद्यार्थी गिरवणार रामायण-महाभारताचे धडे! एनसीईआरटीची शिफारस

    22-Nov-2023
Total Views | 82

Ramayana-Mahabharata


नवी दिल्ली :
लवकरच शाळेत विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारताचे धडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र समितीने ही शिफारस केली आहे. तसेच शाळेतील वर्गखोल्यांमध्ये भिंतीवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याचीही शिफारस समितीकडून करण्यात आली आहे.
 
या समितीचे अध्यक्ष सीआय इसाक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये काही बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच एनसीईआरटीकडून तज्ञांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये रामायण आणि महाभारतासारख्या महाकाव्यांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. विद्यार्थ्यामध्ये देशभक्ती आणि आपल्या राष्ट्राचा अभिमान वाढावा यासाठी ही शिफारस केल्याचे सांगण्यात येत आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121