सोलापूर शहरात जन्मलेला मारुती निसर्गात लपलेल्या एकांत महादेवाच्या दर्शनाने ‘अरण्यऋषी’ झाला. या अरण्यऋषीचे शिष्यत्व एकलव्याप्रमाणे स्वीकारलेल्या शिष्याच्या भेटीची ही कहाणी.
Read More
नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
Vibha Guidance Hub तर्फे आयोजित VGH महा एक्झिबिशन 2025 हा बहुआयामी सामाजिक उपक्रम दिनांक 29 मे ते 1 जून 2025 दरम्यान IES अश्लेन शाळा, डी. एस. बाब्रेकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – 400028 (कॅटरिंग कॉलेजच्या मागे, शिवाजी पार्क टेलिफोन एक्सचेंजजवळ) येथे सकाळी 11 ते सायंकाळी 8 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क मैदानावर भव्य अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार असून अनेक दिग्गज मंडळी कविता वाचन करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने विलेपार्ले येथे 'उत्तुंग महाखादी प्रदर्शन' आयोजित करण्यात येणार असून मुंबईकरांना खादी वस्त्रांसह विविध सेंद्रिय उत्पादनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बावीस्कर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.
भारतीय सक्षम आणि समर्थ स्त्री हाच भारताचा खरा दागिना आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध बँकिंग तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी केले. जीजेईपीसी आयोजित १७ व्या आयआयजेएस एक्झीबिशनचे उद्घाटन मुंबईतील बॉम्बे एक्झीबिशन सेंटर येथे पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमृता फडणवीस यांनी भूषवले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र उद्योग विकास आयुक्त देवेंद्रसिंह खुशवाह, भारतीय उद्योग आणि व्यापार खात्याचे संचालक आर. अरुलानंदन, सेन्को गोल्ड अँड डायमंडचे व्यवस्थापकीय संचालक सुवंकर सेन उपस्थित हो
‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे ग्रंथालय हे नैसर्गिक इतिहासाला समर्पित असलेले भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक आहे (BNHS rare book exhibition). या ग्रंथालयामधील दुर्मीळ पुस्तकांचा ठेवा वाचकांच्या भेटीला येणार आहे (BNHS rare book exhibition). याच दुर्मीळ पुस्तक प्रदर्शनाविषयी माहिती देणारा हा लेख...(BNHS rare book exhibition)
( Art Carnival )"कला आपल्याला एकाच वेळी स्वतःला शोधण्यास आणि विसर्जित करण्यास अनुमती देते." काळात विलीन झालेल्या फ्रान्सच्या सुप्रसिद्ध लेखकाचे वाक्य आज आठवते. कारण ह्याच दुहेरी अनुभवाचा आनंद लुटण्याकरिता १८ ते २४ ऑक्टोबर सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेमध्ये कलेची आवड असणाऱ्या लोकांची पावले जगभरातून मुंबईच्या वांद्रे रिक्लेमेशनच्या दिशेने वळणार आहेत.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काढलेल्या निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन सांघिक कार्यालय, मुंबई येथे लावण्यात आले. यात जंगली प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्या आकर्षक छायाचित्रांचा समावेश होता. तसेच उत्तरकाशी येथे सुमारे १० ते १५ हजार फुटांवर ट्रेकिंग करून यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या मोहिमेच्या छायाचित्रांचे सुद्धा प्रदर्शन लावण्यात आले होते.
चित्रकार व सुलेखनकार सुभाष जमदाडे यांचे 'मंत्राक्षरे' व दि. २६ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत सुरेश गोसावी यांच्या 'भक्ती' आणि 'शक्ती' या चित्रांचे एकत्रित प्रदर्शन 'जहांगीर आर्ट गॅलरी' फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. उभय चित्रकार हे पुण्यातील असून पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून कलेचे शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत या दोघांची अनेक एकल प्रदर्शने पुणे आणि मुंबई येथे भरली आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सर ज. जी. कला, वास्तुकला व उपयोजित कला महाविद्यालय, मुंबई यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व सदिच्छा भेटीचा कार्यक्रम गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर ज. जी. कला महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केल्याचेही पत्र सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या स्वागतासाठी यावेळीआ योजित केलेल्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साक
‘जी२०’ शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय माध्यम कक्षास भेट देऊन परिषदेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसोबत अल्पसंवाद साधला. ‘जी२०’ शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील नव्याकोऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात करण्यात आले होते. या परिषदेचे वार्तांकन करण्यासाठी देशविदेशातून सुमारे दोन ते तीन हजार पत्रकार आले होते. त्यांच्यासाठी परिषदेस्थानी भव्य अशा दोन आंतरराष्ट्रीय माध्यम कक्षांची उभारणी करण्यात आली होती.
सहावे ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस लवकरच आयोजित केले जाणार आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागांतर्गत सर्व्हिसेस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलतर्फे आयोजित केले जाणारे ग्लोबल एक्झिबिशन ऑफ सर्व्हिसेस २०२३ ग्रेटर नोएडा येथे इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्टमध्ये १४ ते १६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होणार आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
हॅण्ड टूल्स आणि फास्टनरएक्स्पो दि. १ ते ३ सप्टेंबरदरम्यान मुंबईत गोरेगाव पूर्व येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने एकूणच या प्रदर्शनाविषयी आणि आगळ्यावेगळ्या इंडस्ट्रीविषयी...
१९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ’ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ' यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राष्ट्रीय छायचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ठाण्यात १८ ते २० ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रगती मैदान येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र संकुल राष्ट्राला समर्पित करणार आहेत. देशात बैठका, परिषद आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र साकारण्यात आले आहे.
पुणे : स्टारविन्स ग्रुपतर्फे शुक्रवार, दि. २१ ते दि. २३ एप्रिल या कालावधीत ‘क्षण' या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील ६० छायाचित्रकारांची ग्रे स्केल, फोटो स्टोरी, शॅडोज्, हिस्टॉरिकल मोन्यूमेंटस्, पॅटर्न या विषयांवरील २०० छायाचित्रे या प्रदर्शनात झळकणार आहेत. प्रदर्शनाचे यंदाचे आठवे वर्ष आहे.
सर्जनशील शिल्पांची बोलकी अभिव्यक्ती, विविध शैली आणि माध्यमांतील सुरेख चित्राकृती आणि साथीला दिग्गज चित्र, शिल्पकारांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन असा त्रिवेणी संगम असलेल्या ‘के. के. वाघ संस्थे’च्या लालित कला महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी झाला.
पार्ले टिळक विद्यालयाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे अंतरीक्ष प्रदर्शनाचे आयोजन केले होते. शनिवार ७ आणि रविवार ८ जानेवारी, अशा दोन दिवसात हे प्रदर्शन पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानावर भरवले होते. मुंबईतील विविध शाळांमधून या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
जगविख्यात भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांच्या १७४ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘राजा रविवर्मा चित्र-विश्व’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन ठाण्यातील प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या दालनात करण्यात आले आहे.
विश्व संवाद केंद्र, पुणे व सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माध्यम संवाद परिषदेप्रसंगी प्रख्यात अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ग्रंथ विक्री दालनास रविवारी सदिच्छा भेट दिली
भारतीय बनावटीच्या उत्पादनांना मिळणार जागतिक बाजारपेठ
आ. अॅड. आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या कला-कलाकार आणि कलाकृतींविषयक स्तुत्य उपक्रमांत्मक कार्य करणार्या, १०२ वर्षांच्या संस्थेने जहांगिर कलादालनात या सप्ताहात म्हणजे दि. १० ते १७ फेबु्रवारी या काळात भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
दि. ७ जानेवारी रोजी ६०व्या राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यांच्याच हस्ते विविध सन्मान आणि गौरव प्रदान केले जाणार आहेत. तेव्हा या ऐतिहासिक प्रदर्शनाची पार्श्वभूमी आणि स्वरूप यांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
नोंद असलेल्या या काही सन्मानप्राप्त कलाकृतींसह १९३० ते १९७६ अशा सुमारे पाच तपांच्या कलासाधनेत सोलेगांवकरांची कला दीर्घायु वटवृक्षाप्रमाणे बहरली. इतका मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक कलासाधक, त्यांच्या समकालीन कलाकारांच्या तुलनेत प्रसिद्धीच्या झोतात आला नाही.
अनुभवी चित्रकार बालाजी उबाळे यांचे जहांगिर कला दालनात नुकतेच २ डिसेंबरला प्रदर्शन संपन्न झाले.
अगदी पुराणकाळापासून स्त्रीला वेगवेगळ्या विषयांसाठी मुख्य घटक वा केंद्रस्थानी मानले गेलेले आहे. अगदी रामायण-महाभारतादी ग्रंथकथा या 'स्त्री' तत्त्वाभोवतीच गुंफलेल्या आहेत. कथा-कविता-कादंबऱ्या-मालिका -सिनेमे अशा सर्वच दृक्श्राव्य आणि लिखित माध्यमांमध्ये स्त्रीचं स्थान केंद्रस्थानी असेल तर सदर माध्यम हे रसिकमान्य ठरते. हाच विषयधागा पकडून आपण आधुनिक कलाकारांच्या कलाविषयाकडे वळलो तर आपल्या ध्यानात येईल की, 'स्त्री' या विषयावरील कलाकृती साकारण्याकडेच कलाकारांचा कल असतो. येथे 'कलाकार' हा शब्द चित्रकार तथा पेंटर आणि
कला संचालनालयामार्फत ६० व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन ७ ते १३ जानेवारी २०२० दरम्यान करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन कला संचालनालयाच्या व्यावसायिक कलाकार विभागामार्फत भरविण्यात येणार आहे
आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) यांच्यासह सर्व चिकित्सापद्धतींना एकत्र आणण्याचा संकल्प घेऊन आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य’ या संमेलनाचा समारोपही रविवारी उत्साहात झाला.
संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीचा एक महत्वाचा भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय योग कार्यशाळा. या कार्यशाळेमध्ये भारतभरातून योग विषयातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शनासाठी उपस्थिती दर्शवणार आहेत. ही कार्यशाळा 'योग' या संकल्पनेबद्दल जाणून घेण्याची इच्छा असलेले आणि या उपक्रमाबद्दल फारशी माहिती नसलेले देखील या कार्यशाळेचा भाग होऊ शकतात
वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी आयुष क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञ आणि मान्यवरांचा जीवनगौरव व इंटरनॅशनल एक्सलेंस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात सुरू असलेल्या 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य' या संमेलनात भरवण्यात आलेल्या औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनात आयुष अंतर्गत येणाऱ्या सर्व पॅथीतील औषधोपचारासाठी लागणाऱ्या वनस्पतींची विस्तृतपणे माहिती देण्यात येत आहे.
वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य या दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटर येथे सुरू असलेल्या संमेलनाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली
प्राण्यांच्या बाबतीत शारीरिक सौंदर्य आणि सुदृढता हा जोडीदार मिळवण्यासाठी जसा प्राथमिक निकष ठरतो, तसाच माणसाच्या बाबतीत 'श्रीमंती' हा प्राथमिक निकष बनला आहे. वस्तूंचा अमर्याद वाढलेला उपभोग आणि त्यामुळे संसाधनांची होणारी अपरिमित हानी यामागे ही 'प्रदर्शनप्रवृत्ती' कारणीभूत आहे.
अभिनेते योगेश सोमण यांचा पालेकरांवर व्यापक कटाचा आरोप... "अशा कार्यक्रमाला जायचं औचित्यभंग करायचा आणि पत्रकार परिषद घेऊन म्हणायचं माझी मुस्कटदाबी केली. अमोल पालेकर असा हा तुमचा व्यापक कट आहे. असं मला वाटत. बारशाच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला निमंत्रित केलं आणि अमोल पालेकर तिथं मर्तिकाचे श्लोक म्हणायला लागले. ज्या बाळाचं बारसं आहे त्याच्या आईवडिलांना राग येणारच की हो. असा औचित्यभंग केल्याबद्दल मीच तुमचा निषेध करतो."
अमोल पालेकर एकेकाळचे प्रसिद्ध वगैरे अभिनेते, दिग्दर्शक असतील, त्याबाबत दुमत नाहीच. पण गेल्या काही काळापासून अमोल पालेकरांना स्वतःचीच किंमत कवडीमोल करून घेण्याचा म्हातारचळ लागल्याचे दिसते. यातूनच ते जिथे जातील तिथे औचित्य सोडून इतरच विषयावर तोंडाची वाफ दवडताना पाहायला मिळतात. बरवे यांच्यावरील चित्रप्रदर्शनातही पालेकरांनी स्थळ-काळाचे भान सोडून विषय भरकटवण्याचाच प्रयत्न केला.
१००८ महामंडलेश्वर स्वामी यांचे प्रतिपादन
ज्येष्ठ चित्रकार श्रीधर केळकर यांच्या चित्रांची विक्री आणि प्रदर्शन कल्याणमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक ८ जानेवारी २०१९ ला मुंबईची कलापंढरी म्हणून ओळख असलेल्या जहांगीर कलादालनात "महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन",(कलाकार विभाग)सुरु झाले.
महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कलासंचालनालयाद्वारे यावर्षी ५९वे ‘महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. हे ‘राज्य कला प्रदर्शन’ १९५६ पासून आयोजित करण्यात येते. १९५६ ते २०१९ एवढ्या प्रदीर्घ काळात चालणारी आणि महाराष्ट्रातील व्यावसायिक कलाकारांना प्रोत्साहन देणारी शासनाची योजना निश्चितच उत्साह वाढविणारी आहे.
‘गोदास्पंदन’ कार्यक्रमातील चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
आ. सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जि.प. अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साधना माध्यमिक विद्यालय कासोदा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील 44 वे विज्ञान प्रदर्शन शहरातील गुरुकुल इंग्लिश मेडिअम शाळेत घेण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनासाठी लोहारा जि. प.मराठी मुलांची शाळा मधील प्रथमेश पुरुषोत्तम सुर्वे याने अग्निशमन यंत्र ,सुमित सुनील क्षीरसागर ऋषभ प्रदीप क्षीरसागर यांनी जैविक शेती हे साहित्य बनवले होते त्यांना वर्गशिक्षक अविनाश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
येथील नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण सभापती अॅड.बोधराज चौधरी यांचे हस्ते करण्यात आले.
’बालासन’ किंवा ‘बलसान’ हे एका नदीचं नाव. हिमालयाच्या खोर्यात वसलेल्या दार्जिलिंग जवळ उगम पावणारी ही नदी दक्षिण-पूर्वेच्या समुद्राला जाऊन मिळते. उंचाहून उताराकडे वेडीवाकडी वळणे घेत ही नदी समुद्राला बिलगायला जाते.
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे, या उद्देशाने नागरिकांमध्ये जागृती निर्माण करून, त्यांच्यात झाडे लावण्याची व जगविण्याची आवड निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनानिमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ’पालवी २०१८’ हे कुंडीतील रोपांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.