वर्ल्ड आयुष एक्स्पोमध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचे भंडार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019
Total Views |


 

नवी मुंबई : वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात सुरू असलेल्या 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य' या संमेलनात भरवण्यात आलेल्या औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनात आयुष अंतर्गत येणाऱ्या सर्व पॅथीतील औषधोपचारासाठी लागणाऱ्या वनस्पतींची विस्तृतपणे माहिती देण्यात येत आहे. प्रदर्शनात उन्हाळी, साबुदाणा, जंबु, कुटज, वसू, वाळा, माका, उंडी अशा १८० हुन अधिक प्रकारच्या वनस्पतींची माहीती देण्यात येत आहे. यात वनस्पतींचे मराठी, इंग्रजी आणि हिंदीतील नाव, उपयोग आदी माहिती देण्यात आली आहे.

 

संमेलनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना याबद्दल माहिती व्हावी, त्यांचे उत्पादन घेता यावे या हेतूने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. डॉ. जी. डी. पोळ फाउंडेशनच्या वाय. एम. टी. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण प्रदर्शनासाठी सहकार्य केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@