‘आयुष’क्षेत्रातील मान्यवरांचा ‘एक्स्पो 2019’ संमेलनात गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019
Total Views |


नवी मुंबई :वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’ आणि आरोग्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी आयुष क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञ आणि मान्यवरांचा जीवनगौरव आणि ‘इंटरनॅशनल एक्सलेंस’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. सिडको एक्झिबिशन सेंटरच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात देशभरातील विविध डॉक्टर, मान्यवर आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्रालयाचे आयुर्वेद सल्लागार डॉ. मनोज नेसरी, आध्यात्मिक गुरू डॉ. अवधूत शिवानंद, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे केंद्र व राज्य स्तरीय सल्लागार डॉ. श्रीराम सावरीकर, डॉ. जी. डी. पोळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 

धन्वंतरी प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो’ आयोजन समितीचे सचिव डॉ. विष्णू बावणे म्हणाले की, “वर्ल्ड आयुष एक्स्पो संमेलन ही एक क्रांती असेल. कारण, या संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातीलघराघरात स्वास्थ्य’ हा महत्त्वाकांशी उपक्रम संपन्न होणार आहे. त्याचा पाया आज रचण्यात आला आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व पॅथींच्या माध्यमातून एका माध्यमातून काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था, नवी दिल्ली येथील विद्यार्थ्यांनी यावेळी योगप्रदर्शनाद्वारे उपस्थितांची मने जिंकली.

 

आध्यात्मिक गुरू डॉ. अवधूत शिवानंद यावेळी म्हणाले, “एकात्मिक औषधोपचार प्रणाली म्हणजेच पारंपारिक औषधोपचार पद्धत आणि आधुनिक उपचार पद्धती यांचा मेळ बसायला हवा. जगातील इतर देशांमध्ये केवळ आरोग्य मंत्रालयामार्फत सर्व औषधोपचार पद्धती आणि त्यांच्या विकासाचे काम पाहीले जाते. मात्र, भारतात आरोग्य मंत्रालयासह आयुष मंत्रालयही या क्षेत्रातील काम पाहत आहे. आरोग्य क्षेत्रात अजूनही एकात्मिक औषधोपचार प्रणालीचा विस्तार वाढवण्याची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

निमाचे सहसंस्थापक एस.पी. किंजवडेकर यांना आयुर्वेदातील भरीव योगदानाबद्दल ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयुष क्षेत्रातील विविध पॅथींमधील योगदानाबद्दल डॉ. पी. एस. पवार, निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभूर्निकर, आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. श्रीराम शंकर, ‘आयुर्वेदीक पत्रिका’चे संपादक वैद्य एकनाथ कुलकर्णी, स्त्रीरोगतज्ज्ञ सल्लागार डॉ. एच. एस. पालेप, प्राध्यापक डॉ. आशुतोष कुलकर्णी, ड़ॉ. राजा ठाकूर, गजानन केळकर, गुरूमाऊली, वैद्य समीर जमदग्नी, डॉ. विजय वेलणकर, डॉ. नरेंद्र गुजराथी, डॉ. सदानंद देशमुख, डॉ. बाळासाहेब आहेर, डॉ. एकनाथ कुलकर्णी, डॉ. साक्षी आहिरे, डॉ. अनील गुजर, डॉ. एम.एच.परांजपे, डॉ. एच.पी.शर्मा आदीं मान्यवरांचा कार्यक्षेत्रात योगदानाबद्दल ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

 

‘आयुष’च्या विविध पॅथींद्वारे आपल्या कार्यक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा ‘इंटरनॅशनल एक्सलेंस अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वैद्य प्रवीण जोशी, वैद्य सुविनय दामले, वैद्य सूर्यकांत वाघ, वैद्य ज्ञानेश्वर थोरात, डॉ. दत्ता पाटील, डॉ. अरुण कोळी, डॉ. परशुराम पवार, डॉ. सचिन जाधव, डॉ. रामदास आव्हाड, डॉ. घनश्याम मद्रा आदी मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

 

नॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या कामात महाराष्ट्राचा वाटा मोलाचा !

 

नॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशच्या कामात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे असल्याची माहिती नॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे (आयएनओ) राष्ट्रीय अध्यक्ष आनंद बिरादार यांनी दिली. ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’ आणि आरोग्य या संमेलनाला नॅशनल नेचरोपॅथी-योगा नॉन कम्युनिकेबल डिसीज' या चर्चासत्रानिमित्त घेण्यात आला. कार्यक्रमाला क्रियायोगी फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू मंगेशदा, आयएनओचे महाराष्ट्र आणि गोवा अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर तिवारी, प.पू. धर्माचार्य महाराज, अ‍ॅक्युप्रेशर तज्ज्ञ डॉ. संतोष पांडे, अभिनेत्री आणि आयएनओ ब्रॅण्डअ‍ॅम्बॅसिडर ईशा कोपिकर, उत्तर महाराष्ट्र आयएनओचे शिवानंद महाराज, ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो’चे सचिव डॉ. डॉ. विष्णू बावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@