श्रीधर केळकर यांचे चित्रकला प्रदर्शन आणि विक्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
कल्याण : ज्येष्ठ चित्रकार श्रीधर केळकर यांच्या चित्रांची विक्री आणि प्रदर्शन कल्याणमध्ये आयोजित करण्यात आले आहे. दि. २४ ते २७ जानेवारीदरम्यान केळकर कलादालन, केळकर सदन, नमस्कार मंडळाजवळ, आग्रा रोड, कल्याण पश्चिम येथे सायंकाळी ५ ते १० या वेळेत पार पडणार आहे. श्रीधर केळकर हे गेल्या ५५ वर्षांपासून केळकर कलादालनात चित्र निर्मितीचे अखंड काम करित आहेत.
 
यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनात १९७० सालानंतर गणेशोत्सवादरम्यान काढण्यात आलेली तैलचित्रे, शाळा, संस्था, बँकांची तैलचित्रांची छायाचित्रेही कलादालनात पाहायला मिळणार आहे. तेसच पेन्सिल ड्रॉईंग, वॉटर कलर, पोस्टर कलर, ऑईल कलरच्या साहाय्याने काढण्यात आलेली चितेही पाहता येणार आहेत. श्रीधर केळकर हे ज्येष्ठ चित्रकार असून त्यांनी १९९९ ते २०१५ या कालावधीत वनवासी कल्याण आश्रमाचे कल्याण शहर अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच छत्रपती शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीवरही त्यांनी २६ वर्षे काम केले असून या ठिकाणी ते चित्रकला शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. दरम्यान, आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन विनामूल्य असून अधिक माहितीसाठी ९९८७००७३७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@