प्रगती मैदान आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्राचे २६ जुलै रोजी लोकार्पण

    25-Jul-2023
Total Views | 50
PM Modi Inaugurate International Exhibition and Conference Centre

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रगती मैदान येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र संकुल राष्ट्राला समर्पित करणार आहेत. देशात बैठका, परिषद आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र साकारण्यात आले आहे.

प्रगती मैदानावरील जुन्या आणि कालबाह्य सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणारा हा प्रकल्प सुमारे २७०० कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आला आहे. सुमारे १२३ एकर परिसर असलेले हे संकुल भारतातील सर्वात मोठे बैठक, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शन स्थळ म्हणून विकसित केले आहे. कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या जागेच्या बाबतीत, जगभरातील अव्वल प्रदर्शन आणि परिषद संकुलांमधील हे एक संकुल आहे. प्रगती मैदानावर बांधण्यात आलेल्या या नवीन परिषद केंद्रात प्रदर्शन सभागृह, अॅम्फी थिएटर्स सह अनेक अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

प्रगती मैदान संकुलातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून हे परिषद केंद्र विकसित केले आहे. या परिषद केंद्राची रचना आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, व्यापार मेळावे, संमेलन, परिषदा आणि इतर प्रतिष्ठित कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्याच्या दृष्टीने केली आहे. येथील भव्य बहुउद्देशीय सभागृह आणि प्लेनरी हॉलची एकत्रित क्षमता सात हजार लोक इतकी असून ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सिडनी ऑपेरा हाऊसच्या आसन क्षमतेपेक्षा अधिक आहे. येथील भव्य अॅम्फी थिएटरची आसन क्षमता ३,००० व्यक्ती बसू शकतील इतकी आहे.

या परिषद केंद्राच्या इमारतीची वास्तुशिल्प रचना भारतीय परंपरांनी प्रेरित आहे आणि आधुनिक सुविधा आणि जीवनशैलीचा अवलंब करताना भारताचा भूतकाळातील आत्मविश्वास आणि श्रद्धा यातून दिसून येते. इमारतीचा आकार शंखासारखा आहे. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र परिसरात एकूण सात प्रदर्शन हॉल आहेत. हा प्रत्येक हॉल प्रदर्शन, व्यापार मेळे आणि व्यवसायिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक बहुउद्देशीय स्थान म्हणून वापरला जाऊ शकतो. विविध प्रकारच्या उद्योगांना सामावून घेत, जगभरातील उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शन हॉलची रचना करण्यात आली आहे. येथील शिल्पे, प्रतिष्ठापने आणि भित्तिचित्रे भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवतात. येथील संगीताच्या तालावर उडणारे कारंजे पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करणारे आणि नेत्रसुखद आहेत. येथील तलाव, सरोवर आणि कृत्रिम प्रवाह यांसारखे जलस्रोत परिसराची शांतता आणि सौंदर्य वाढवणारे आहेत.

या परिसरात ५,५०० पेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनतळाच्या तरतुदीतून अभ्यागतांची सोय हीच आयईसीसी ची प्राथमिकता असल्याचे दिसून येते. सिग्नल मुक्त रस्त्यांद्वारे प्रवासाच्या सुलभतेमुळे अभ्यागत कोणत्याही त्रासाशिवाय कार्यक्रमस्थळी पोहोचू शकतात हे सुनिश्चित होते. तसेच, आयईसीसी च्या एकंदरीत रचनेत अभ्यागतांची अखंड ये - जा सुलभ करून उपस्थितांच्या सोई आणि सुविधांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते.

अग्रलेख
जरुर वाचा
रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवार, दि.२७ रोजी गुजरातमधील वडोदरा येथील सावली येथे असलेल्या अल्स्टॉम या रेल्वेनिर्मिती कारखान्याला भेट दिली. यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत वडोदरा खासदार डॉ. हेमांग जोशी, सावलीचे आमदार केतनभाई इनामदार, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, वडोदरा आणि अहमदाबादचे डीआरएम आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी होते. यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या अल्स्टॉमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121