मुंबई : कोरोनाची तपासण्या करणारी अधिकची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच महापालिका आपत्कालीन कक्षात स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनाच्या तपासण्या करणारी यंत्रणा मुंबई शहर व उपनगरात ठिकठिकाणी उपलब्ध करून दिल्यास संशयित रुग्णांना वेळीच तपासण्या करून घेणे शक्य होईल. तसेच खाजगी लॅबना तपासणीचे परवाने देण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
कोरोना तपासण्यांसाठी अधिकची यंत्रणा उपलब्ध होऊ शकते का? तसेच आपत्कालीन स्वतंत्र हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात यावा, अशा नागरिकांकडून येणाऱ्या विविध
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 17, 2020
सुचना व मागण्यांबाबत मी आज मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून अवगत केले. pic.twitter.com/kGG4bc2sOx