७ ते १३ जानेवारीदरम्यान होणार राज्य कला प्रदर्शन

    17-Oct-2019
Total Views |


 

मुंबई: कला संचालनालयामार्फत ६० व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन ७ ते १३ जानेवारी २०२० दरम्यान करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन कला संचालनालयाच्या व्यावसायिक कलाकार विभागामार्फत भरविण्यात येणार आहे.


या प्रदर्शनात चित्रकला
, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण आणि दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत. या प्रदर्शनात बक्षीसपात्र कलाकृतींना प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत.


इच्छुक कलावंतांनी दिनांक ५ आणि ६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत या कालावधीत कला संचालनालयाचे सर ज.जी. कला दालन
, कला शाळा आवार, डॉ. दा.नौ. मार्ग, मुंबई ४००००१ येथे आपल्या कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन प्रभारी कला संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.