‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’ संमेलनाची शानदार सांगता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2019
Total Views |



 

नवी मुंबईआयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) यांच्यासह सर्व चिकित्सापद्धतींना एकत्र आणण्याचा संकल्प घेऊन आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य’ या संमेलनाचा समारोपही रविवारी उत्साहात झाला. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे भरवण्यात आलेल्या या संमेलनाला आयुष मंत्रालयाअंतर्गत येणार्या सर्व पॅथींचे तज्ज्ञ, विद्यार्थी, वैद्यकीय चिकित्सक आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. गेले चार दिवस या संमेलनाला विविध कार्यशाळा, स्टॉल्स, महाआरोग्य शिबीर, समारंभ, नृत्यस्पर्धा आणि योगशिबिराला हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
 
केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय चिकित्सा परिषद, सिडको, नवी मुंबई महापालिका, डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ आदींच्या संयुक्त विद्यमाने आणि आ. प्रशांत ठाकूर व मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेदातील विविध चिकित्सा पद्धतींविषयी पन्नासहून जास्त कार्यशाळा व दहा परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. ’वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ व आरोग्य’ या संमेलनाच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच विद्यार्थी आणि वैद्यकीय प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. शेवटच्या दिवशीही आयोजक आणि सहभागी होणार्यांमध्ये तितकाच उत्साह कायम होता. दिवसभर होमिपॅथीवरील परिसंवाद, सिद्ध, पंचगव्य, मणक्यावरील उपचार, वनौषधी आदींची विस्तृत माहिती चर्चासत्र व कार्यशाळांमध्ये देण्यात आली. कार्यक्रमासाठी विशेषतः शेतकर्यांना आयुर्वेदीक वनस्पतींची बाजारातील मागणी लक्षात यावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी-ग्राहक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते.
 
मनुष्याच्या प्रदीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त असेल आयुर्वेदातील उपचारपद्धती ’कायाचिकित्सा’ या विषयावर परिसंवाद, युनानी, आयुर्वेदातील त्वरित आजाराचे निदान करणार्या पद्धतींविषयी माहिती देणारे सत्र, सूत्रबोध-वैद्यकीय क्षेत्रातील शिकवण्याची पद्धत याविषयी मार्गदर्शन देण्यात आले. या संमेलनानिमित्त आयुष क्षेत्रातील देशातील व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध तज्ज्ञ, प्राध्यापक, डॉक्टर यांच्यासह मान्यवर संस्थांचे प्रतिनिधी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. दिलीप म्हैसेकर, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष (सीसीएच) डॉ. अरुण भस्मे, होमिओपॅथी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे अधिष्ठाता डॉ. धनाजी बागल, जी. डी. पोळ फाऊंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. गजानन पोळ, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे डॉ. राजकुमार पाटील, प्राध्यापक सुरेश नंदाल, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे सदस्य डॉ. बी. टी. रुद्रेश आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा पार प़डला. संमेलनाचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, सचिव डॉ. विष्णू बावणे, डॉ. दीपक घुमे, वायएमटी आयुर्वेदिक महाविद्यालय प्राचार्य डॉ. संजीव यादव आणि उपप्राचार्य डॉ. निनाद साठे आदींच्या मार्गदर्शनाने चार दिवस सुरू असलेल्या संमेलनाला भरघोस प्रतिसाद मिळाला.
@@AUTHORINFO_V1@@