‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य’ची शानदार सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |



योग, प्रदर्शन, परिसंवाद एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी

 

नवी मुंबई : वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य या दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटर येथे सुरू असलेल्या संमेलनाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. पहिल्या सत्रातील कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी उत्स्पूर्दपणे सहभाग नोंदवला. गुरुवारी सकाळी ९ वाजता योग शिबिराला सुरुवात झाली. श्री अंबिका योग कुटीर, ठाणे यांच्या संकल्पनेतून घेण्यात येणाऱ्या या योगशिबिराला सर्व वयोगटातील योगअभ्यासकांनी उपस्थिती दर्शवली होती.

 

केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय चिकित्सा परिषद, सिडको, नवी मुंबई महापालिका, डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ आदींच्या संयुक्त विद्यमाने आणि आ. प्रशांत ठाकूर व मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आयुर्वेद मंत्रालयाअंतर्गत होणार्‍या या संमेलनाला आयुषम्हणजेच आयुर्वेदातील विविध चिकित्सा पद्धतींविषयी पन्नासहून जास्त कार्यशाळा व दहा परिसंवादांचे आयोजन करण्यात येणार आहे. संमेलनाला भेटी देणार्‍या सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत भव्य महाआरोग्य शिबीरही घेण्यात येईल.

 

सिडको एग्झिबिशन सेंटर येथे सुरू असलेल्या या संमेलनाला एकाच वेळी वेगवेगळ्या आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) या चिकित्सापद्धतींना आणि या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला भेटी देणाऱ्या व्यक्तींना औषधी वनस्पतींची पिकांची माहिती दिली जाणार आहे. सिडको एग्झिबिशन केंद्रातील बाहेरील प्रांगणात डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन वाय.टी.एम. आयुर्वेदीक मेडिकल कॉलेज, खारघरच्या विद्यार्थ्यांतर्फे औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@