हॅण्ड टूल्स आणि फास्टनर्स व्यवसायात स्टार्टअपला संधी

    31-Aug-2023   
Total Views |
Hand Tools and Fasteners Startup

हॅण्ड टूल्स आणि फास्टनरएक्स्पो दि. १ ते ३ सप्टेंबरदरम्यान मुंबईत गोरेगाव पूर्व येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने एकूणच या प्रदर्शनाविषयी आणि आगळ्यावेगळ्या इंडस्ट्रीविषयी...

‘स्टार्टअप इंडिया’ हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम. या उपक्रमाचा उद्देश देशातील स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण कल्पनांची एक मजबूत इकोसिस्टम तयार करणे आहे, ज्यामुळे देशाचा आर्थिक विकास होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ‘स्टार्टअप इंडिया’ हे ‘स्टॅण्डअप इंडिया’ आहे, याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या २०१४च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केली होती. देशीतील तरुणांना मदत करण्यासाठी मोदी सरकारची ही एक प्रभावी योजना आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना उद्योगपती आणि उद्योजक बनण्याची संधी देण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे, ज्यासाठी बँकांद्वारे देशातील तरुणांना वित्तपुरवठादेखील करण्यात येतो, जेणेकरून ते चांगल्या ताकदीने उद्योग-व्यवसायाची सुरुवात करू शकतील आणि भारतात रोजगार निर्मितीला चालना मिळेल. त्याच अनुषंगाने २०२३-२४च्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठी अनेक घोषणाही करण्यात आल्या.

भारतातील सर्वात मोठा ‘एचटीएफ एक्सो’


‘एचटीएफ’(हॅण्ड टूल्स अ‍ॅण्ड फास्टनर्स) हा भारतातील सर्वांत मोठा आणि एकमेव ‘बीटूबी’ कार्यक्रम आहे. जो हॅण्डटूल्स, पॉवर टूल्स व फास्टनर्स स्पेशालिटी टूल्स इत्यादीसारख्या उच्च श्रेणींच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करतो. विविध क्षेत्रांमध्ये उत्पादन पुरवठा साखळीमध्ये महत्त्वाचा दुवा बनण्याची ही एक उत्तम संधी आहे. हॅण्ड टूल्स आणि फास्टनरएक्स्पो दि. १ ते ३ सप्टेंबरदरम्यान मुंबईत गोरेगाव पूर्व येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रकारातील वस्तूंचे उत्पादन २०२५ पर्यंत एक ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. परिणामी, हॅण्ड टूल्स आणि संलग्न उत्पादनांच्या बाजारपेठेला चालन मिळेल, जी सध्या सुमारे आठ टक्के आहे. दशक बदलत असताना २०२१-२२ मध्ये भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला. याचे कारण पायाभूत सुविधांमधील भरघोस वाढ आणि निर्यातीत अनेक पटींनी झालेली वाढ. निर्यातवाढीमध्ये टूल्स, यंत्रसामग्री व उपकरणे ही उत्पादने आघाडीवर आहेत.


 पॉवर टूल्सच्या जागतिक बाजारपेठेचे मूल्य २०२२ मध्ये २६.६१ अब्ज डॉलर्स इतके होते, तर भारताचा त्यातील वाटा ५.६ अब्ज डॉलर्स इतका होता. याचाच अर्थ भारतीय उपखंडात औद्योगिक साधनांची मागणी व उत्पादन वाढ लक्षणीय आहे. कृषी, हवाई वाहतूक, बांधकाम व औद्योगिक क्षेत्रातील उपाययोजनांमुळे या उद्योगाच्या विकासाला गती मिळाली आहे.भारतातील हॅण्ड टूल्स, पॉवर टूल्स आणि फास्टनर्सचा सर्वांत मोठा एक्स्पो म्हणून ओळखला जाणारा ‘एचटीएफ एक्स्पो’ म्हणजे अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांची एक मालिका असते. भारतातील व आंतरराष्ट्रीय इंडस्ट्रियल टूल्स, फास्टनर्स कटिंग व वेल्डिंग उपकरणे लेझर तंत्रज्ञानाचा वापर करणारी यंत्रसामग्री, इंजिनिअअरिंग व मशीन टूल्स उद्योग या उभारी देण्यात एक्स्पो महत्त्वाची भूमिका बजावतो. या कार्यक्रमांमुळे उद्योगक्षेत्रातील सर्व घटकांना समन्वय साधण्यासाठी, सहयोग वाढविण्यासाठी तसेच नवनवीन तंत्रज्ञान व उत्पादने पाहण्यासाठी सामायिक व्यासपीठ उपलब्ध होते. तसेच यात दीर्घकाळ टिकणार्‍या व्यावसायिक सहयोगांचे लाभदायी करार आकाराला येतात.
 
‘एचटीएफ २०२३’


‘एचटीएफ २०२३’ येथे होणारे अन्य सर्व कार्यक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन असते. अवजड अभियांत्रिकी साधने, बांधकामासाठी लागणारी साधने, वाहन उद्योगाला लागणारी साधने, लाकूडकामाची हत्यारे, हवाई वाहतुकीसाठी लागणारी साधने, बागकाम कृषी क्षेत्रात लागणारी साधने या प्रदर्शनात मांडली जातात. याशिवाय स्पॅनर्स रेंचेस हातोडे, प्लायर्स व कापण्याची हत्यारे औद्योगिक टूल्स, सॉब्लेड्स रोटरी वअ‍ॅसिलेटिंग टूल्स, ग्राइंडर्स व सॅण्डर्स, राऊटर्स आणि कटआऊट टूल्स, हीट गन्स व इंडस्ट्रियल फास्टनर्स व फिक्सिंग्ज एरोस्पेस फास्टनर्स, स्क्रू व वॉशर्स फास्टनर्स उत्पादन तंत्रज्ञान, फास्टनर्स उत्पादनाची यंत्रसामग्री, इन्सर्टस व रिव्हेर्ट्स आदी उत्पादनांची विविध श्रेणीही यात प्रदर्शित असते. ऑस्ट्रिया, चीन, फ्रान्स, भारत, इटली, तैवान, नेदरलॅण्डसयुनायटेड किंग्डम आणि अमेरिका यांसारख्या नऊहून अधिक देशांतील ३०० हून अधिक प्रदर्शक व ब्रॅण्ड्स या एक्स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच या अव्वल दर्जाच्या प्रदर्शनास १२ हजारांहून अधिक व्यक्ती भेट देतील, असे अपेक्षित आहे. सर्व प्रमुख ट्रेड असोशिएशन, ट्रेड मीडिया तसेच धातू, धातूकाम व संबंधित उद्योगांची पोर्टल्स यांनी या एक्स्पोला पाठबळ दिले आहे.

‘हॅण्ड टूल्स अ‍ॅण्ड फास्टनर्स एक्स्फो २०२३’ या प्रदर्शनाला भारतातून तसेच शेजारील देशांतून दर्जेदार प्रतिसाद अपेक्षित आहे.प्रदर्शक आणि अभ्यागतांमध्ये हॅण्ड टूल्स व फास्टनर्सचे ग्राहक, उत्पादक, पुरवठादार आणि सेवा पुरवठादार यांचा समावेश आहे. हवाई वाहतूक, वाहन, अवजड इंजिनिअरिंग क्षेत्र, संरक्षण एअरोनॉटिकल आस्थापने आणि क्षेत्रातील मोठे वापरकर्ते या प्रदर्शनाला उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे निर्यातदार, आयातदार, वितरक व व्यापारी अशा मोठ्या प्रमाणात खरेदी करणार्‍या ग्राहकांपासून ते गॅरेज व सर्व्हिस स्टेशनमधील कर्मचारी, प्लम्बर्स, इलेक्ट्रिशियन्ससारख्या ग्राहकांपर्यंत सर्व प्रकारचे ग्राहक या प्रदर्शनाला भेट देतात. ‘एचटीएफ २०२३’चे हे २१वे पर्व आहे. या प्रदर्शनस्थळावर अन्य अनेक आंतरराष्ट्रीय उपक्रमही आयोजित केले जातात.


सीडब्ल्यूई २०२३ - कटिंग अ‍ॅण्ड वेल्डिंग इक्विपमेंट एक्स्पो, आयएमईएक्स इंटरनॅशनल मशीन टूल्स एक्स्पो, युएमईएक्स युन्ड मशिनरी एक्स्पो आणि डब्ल्यूओएम वर्ल्ड मेटल एक्स्पो, एक्झिबिशन अ‍ॅण्ड कॉन्फरन्स ऑन मेटल प्रॉडक्शन, मेटल प्रोसेसिंग, मेटल वर्किंग अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज असे अनेक कार्यक्रम येथे होणार आहेत. या तीन दिवसांत खुली चर्चासत्रेही आयोजित करण्यात आली आहेत. हॅण्ड अ‍ॅण्ड पॉवर टूल्स, मशीन टूल्स व अन्य इंडस्ट्रियल मशिनरी या क्षेत्रांतील न्यू टेक्नोलॉजीज फॉर मॅन्यूफॅक्चरिंग इंडस्ट्रीज व अ‍ॅडव्हान्समेंट इन कटिंग अ‍ॅण्ड वेल्डिंग इक्विपमेंट या विषयांवरील अनेक विषयांवर चर्चा होणार आहेत.


शशांक गुळगुळे


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.