घाऊक महागाईच्या दरात घट

    16-Jun-2025   
Total Views | 3


नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. आकडेवारीनुसार, मे २०२५ मध्ये घाऊक महागाई दर १४ महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर आला आहे. अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाई घटली आहे.


मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईत मोठी घट झाली आहे. अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाई ०.३९ टक्क्यांवर आली. एप्रिलमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई ०.८५ टक्के होती. गेल्या वर्षी मे महिन्यात तो २.७४ टक्के होता. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने आहे की, मे २०२५ मध्ये चलनवाढीचा सकारात्मक दर प्रामुख्याने अन्न उत्पादने, वीज, इतर उत्पादन, रसायने, रासायनिक उत्पादने, इतर वाहतूक उपकरणे आणि बिगर-खाद्य वस्तूंच्या उत्पादन इत्यादींच्या किमती वाढल्यामुळे आहे.


घाऊक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात अन्नधान्य वस्तूंच्या किमतीत १.५६ टक्क्यांनी घट झाली, जी एप्रिलमध्ये ०.८६ टक्के होती, तर भाज्यांमध्ये मोठी घसरण झाली. मे महिन्यात भाज्यांच्या किमतीत २१.६२ टक्के घट झाली, जी एप्रिलमध्ये १८.२६ टक्के होती. इंधन आणि वीज यांच्या किमतीतही मे महिन्यात २.२७ टक्के घट झाली, जी एप्रिलमध्ये २.१८ टक्के होती.


'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121