मुंबई: जपानमध्ये सध्या कुर्दीश इस्लामी लोकांविरुद्ध स्थानिक लोकांचा राग प्रकर्षाने दिसून येत आहे. जपानच्या सैतामा प्रांतात कुर्दीश इस्लामींविरुद्ध लोक हातात झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. कुर्दीश इस्लामी हे मूळचे जपानी नाहीत, तर ते तुर्की, इराक आणि सीरियाचे आहेत. यात बहुतेक सुन्नी मुसलमान आहेत. जपानमध्ये जेव्हा कुर्दीश इस्लामींवरील अत्याचार वाढले, तेव्हा माणुसकी दाखवत त्यांना व्हिसा सूट दिली होती. नंतर दक्षिण सैतामा येथील कावागुची आणि वाराबी येथे कुर्दीश लोकसंख्या वाढतच गेली. त्यामुळे स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत.
18 वर्षांत इस्लामसमर्थक तिप्पट
जपानमध्ये सुमारे 48 टक्के लोक शिंटो धर्माचे पालन करतात. शिंटो हा जपानचा स्थानिक धर्म आहे, तर 46 टक्के लोकसंख्या बौद्ध धर्माचे पालन करते.
उर्वरित पाच टक्के लोकसंख्या इतर धर्मांचे पालन करते.त्यात ख्रिश्चन, इस्लाम, यहुदी आणि हिंदू धर्म असे इतर धर्म आहेत. 2005 मध्ये इस्लामसमर्थकांची लोकसंख्या 1 लाख, 10 हजार होती. 2023 मध्ये ती 3 लाख, 50 हजारांपर्यंत पोहोचली. त्यामुळे जपानी वंशाच्या लोकांमध्ये निश्चितच त्यांच्या संस्कृतीबद्दलदेखील चिंता वाढली.