मुंबई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेच्या वार्षिक विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव टेकफेस्टने त्यांच्या 'कॉलेज अॅम्बेसेडर प्रोग्राम २०२५'ची अधिकृतपणे घोषणा केली आहे. या उपक्रमाचा उद्देश देशभरातील विद्यार्थी नेत्यांशी संपर्क साधणे आणि युवा राजदूतांचे देशव्यापी नेटवर्क वाढवणे आहे.
या उपक्रमाद्वारे देशभरातील सर्व राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबई आयोजित टेकफेस्टचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. टेकफेस्टच्या कार्यक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करणे व प्रचार प्रसार करणे, स्पर्धा आणि कार्यशाळांमध्ये सहभाग वाढवणे, तांत्रिक नवोपक्रम आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे यासाठी हे नवोदित अॅम्बेसेडर जबाबदार असतील.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना नेतृत्व, संवाद आणि संघटनात्मक कौशल्ये विकसित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करतो. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याअॅम्बेसेडरना प्रमाणपत्रे, भेटवस्तू, शिफारसपत्रे, टेकफेस्ट आणि त्याच्या भागीदार संस्थांसोबत इंटर्नशिप करण्याची विशेष संधी देण्यात येईल.
याबाबत आयोजकांनी सांगितले की, "कॉलेज अॅम्बेसेडर प्रोग्रामद्वारे, टेकफेस्ट तंत्रज्ञान आणि बदल घडवण्याबद्दल उत्साही असलेल्या विद्यार्थी नेत्यांना ओळखण्याचा आणि सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. नवोपक्रम आणि प्रभावी नेतृत्व करणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना या चळवळीचा भाग बनण्याची संधी देत आहे".