हृदयविकारापासून दूर राहायचं असेल तर 'या' ४ तेलांचा वापर टाळा
04-Jun-2025
Total Views | 25
मुंबई: खाद्यतेल हा प्रत्येक स्वयंपाकघराचा एक अविभाज्य भाग आहे. जरी आपल्याला वाटत असेल की, प्रत्येक खाद्यतेल विकत घेणे हे निरोगी जीवनासाठी बंधनकारक आहे पण हे सत्य फारसे चुकीचे आहे. तज्ञांच्या मते वारंवार हे सिद्ध झाले की अशी अनेक खाद्यतेल आहेत जी मानवाच्या हृदयासाठी चांगली नाहीत त्यांना वापरापासून टाळयला पाहिजे. या तेलांमध्ये कृत्रिम ट्रान्स फॅट्स भरपूर प्रमाणात असतात आणि ती कोलेस्ट्रॉल वाढवणारी ठरतात यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या माहीतीनुसार फॅट-युक्त तेलांनी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल लक्षणीयरीत्या वाढू शकते, जो हृदयविकारासाठी एक जोखीमेचा घटक ठरतो. तर काही अभ्यासांमधून असेही दिसून आले आहे की ओमेगा-६ युक्त तेलांचे जास्त सेवनन हे जळजळ वाढवते जो हृदयविकारस कारणीभूत ठरणारा घटक आहे. खालील अशा ४ स्वयंपाकाच्या तेलांबद्दल पाहुया जे हृदयविकार टाळण्यासाठी पूर्णपणे टाळले पाहिजेत.
मार्गारिन
मार्जारिन हे ट्रान्स फॅटी अॅसिडचे एक प्रमुख स्रोत आहे आणि त्याचे सेवन कोरोनरी हृदयरोगाचा धोका वाढवू शकते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ट्रान्स फॅटी अॅसिडचे सेवन कोरोनरी हृदयरोग (CHD) चा धोका वाढवते.
कॉर्न तेल
कॉर्न तेलात ओमेगा-६ पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात. ओमेगा-६ आवश्यक असले तरीही, जास्त खाल्ल्याने दीर्घकालीन त्रास होऊ शकतो. ही जळजळ धमन्यांचे नुकसान करू शकते आणि हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकचा धोका वाढवू शकते. शुलिच स्कूल ऑफ मेडिसिन अँड डेंटिस्ट्रीने प्रकाशित केलेल्या त्यांच्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, कॉर्न आणि करडईचे तेल जे ओमेगा-६ लिनोलिक अॅसिडने समृद्ध आहे परंतु जवळजवळ ओमेगा-३ α-लिनोलेनिक अॅसिड असते. त्यामुळे ही हानिकारक संयुगे धमन्यात जळजळ व हृदयविकार संबंधित आहेत.
नारळ तेल
आपल्याला हे थोडे वेगळे वाटू शकते, परंतु अभ्यास असेही दिसून आले की, नारळ तेलाचे जास्त सेवन हृदयविकारच्या जोखमीशी जोडलेले आहे. त्यात चरबी असते व चरबीयुक्त आहार हा हृदयविकारासाठी एक प्रमुख जोखीम घटक असलेल्या एलडीएल कोलेस्ट्रॉलशी संबंधित आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन देखील नारळ तेलात चरबीचे प्रमाण असल्याने त्याचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. म्हणूनच निरोगी जीवन जगण्यासाठी नारळ तेलाचा वापर हा नेहमीच मर्यादित ठेवावा.
वनस्पती तेल
वनस्पती तेले चांगली असतात आणि दैनंदिन अन्न सेवनातील आवश्यक आहारातील घटकांपैकी एक असतात. परंतू या वनस्पती तेलाचे फायदे या तेलाला वारंवार गरम केल्याने कमी होऊ शकतात ज्यामुळे लिपिड ऑक्सिडेशन होते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार, वारंवार गरम केलेले खाद्यतेल वापरल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो या अभ्यासातून असेही लक्षात येते की, वारंवार गरम केलेले तेल दीर्घकाळ सेवन केल्याने रक्तदाब आणि एकूण कोलेस्टेरॉल वाढवते.