नॉर्वे : नॉर्वेतील एका शांत गावात आश्चर्यकारक घटना घडली. एका व्यक्तीला सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या अंगणात मोठं कार्गो जहाज दिसलं! हे जहाज थेट त्याच्या घराजवळ येऊन थांबले होते. हे दृश्य पाहून तो चकित झाला. ही घटना लरविक शहरात घडली. ओले बर्ग नावाचा एक स्थानिक रहिवासी रात्री झोपलेला होता. सकाळी उठल्यावर त्याने घराच्या खिडकीतून पाहिलं आणि त्याला विश्वासच बसला नाही. एक मोठं जहाज थेट त्याच्या अंगणात आलं होतं. हे जहाज त्याच्या खोलीपासून काही फुटांवरच थांबले होते.
हे जहाज "एस्सेहोर्न" नावाचं कार्गो शिप आहे. यामध्ये १६ खलाशी होते. जहाज किनाऱ्यावरून बाहेर पडताना नियंत्रणात नव्हतं. त्यामुळे ते रस्त्याजवळच्या एका झाडाला आदळलं आणि ओले बर्गच्या अंगणात घुसलं. ओले बर्गने लगेचच आपली पत्नी आणि मुलाला सुरक्षित ठिकाणी नेलं. नंतर त्याने पोलिसांना आणि आपत्कालीन सेवांना फोन केला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. मात्र घराचे आणि अंगणाचे मोठं नुकसान झालं आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे. जहाजाच्या चालकांवर दारूच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सध्यातरी जहाज तांत्रिक चुकांमुळे आदळल असाव असा अंदाज आहे.
ओले बर्ग म्हणतो, "हे सगळं इतकं आश्चर्यकारक वाटतय, झोपेतून उठल्यावर घरासमोर जहाज!! ही घटना सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत की घरात एवढं मोठं जहाज कसं काय आल?