मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Japanese protest against Kurdish) जपानमध्ये सध्या कुर्दीश इस्लामी लोकांविरुद्ध स्थानिक लोकांचा राग प्रकर्शाने दिसून येतोय. या संदर्भातील काही छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत. जपानच्या सैतामा प्रांतात कुर्दीश इस्लामींविरुद्ध हजारो लोक हातात जपानी झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेत. कारण कुर्दीश इस्लामी हे मूळचे जपानचे लोक नाहीत तर ते तुर्की, इराक आणि सीरियाचे लोक आहेत, ज्यापैकी बहुतेक सुन्नी मुसलमान आहेत. जपानमध्ये जेव्हा कुर्दीश इस्लामींवरील अत्याचार वाढले तेव्हा जपानने माणुसकी दाखवत त्यांना व्हिसा सूट दिली होती. मात्र यानंतर, दक्षिण सैतामा येथील कावागुची आणि वाराबी येथे कुर्दिश लोकसंख्या वाढतच गेली. त्यामुळे जपानी स्थानिक लोक रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत.
हे वाचलंत का? : विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ
जपानमधील कावागुची आणि वराबीचा परिसर एक छोटा कुर्दिस्तान बनला. या भागात त्यांची हळूहळू दहशतही वाढत गेली. त्यामुळे शांतताप्रिय ओळखले जाणारे जपानी वंशाचे लोक आपली मातृभूमी वाचवण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उतरले. सन २०२३ पासून या कुर्दीश इस्लामी लोकांना हद्दपार करण्याची मागणी केली जातेय. वास्तविक जुलै २०२३ मध्ये एका कुर्दीश इस्लामीने दोन जपानी लोकांना ठार मारल्याची माहिती आहे. २०२४ मध्येही काही कुर्दीशांनी जपानी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ दरम्यान जपानमध्ये ६९ कुर्दीशांना गुन्हेगारी आरोपाखाली अटक करण्यात आली. गुन्ह्यांसाठी अटक केलेल्या एकूण परदेशी नागरिकांपैकी हे ६ टक्के आहे. म्हणजेच १०० पैकी ६ गुन्हेगार कुर्दीश इस्लामी लोक असल्याचे आढळून आले. या सर्व घटनांमुळेच जपानमधून कुर्दीशांना हद्दपार करण्याची मागणी होऊ लागली.
१९९९ मध्ये संपूर्ण जपानमध्ये फक्त ५ मशिदी होत्या. २०२१ मध्ये जपानमधील मशिदींची संख्या ११३ झाली. २०२२ मध्ये, ओसाकाच्या निशिनारी वॉर्डमधील एका कारखान्यात बेकायदेशीरपणे मशीद बांधण्यात आली होती. त्यासाठीच्या देणग्या इंडोनेशियातून आल्या होत्या. जुलै २०२३ दरम्यान एका मंदिर संकुलात इस्लामिक स्थलांतरीताने तोडफोड केल्याची घटना घडली होती. त्यानंतर स्थानिकांचा राग आणखी चिघळला. इस्लाम समर्थकांची वाढती लोकसंख्या, स्थलांतरितांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांमुळे जपानमधील लोकांच्या मनातला राग विविध माध्यमांतून दिसून येऊ लागला आहे.
१८ वर्षांत इस्लाम समर्थकांची लोकसंख्या तिप्पट!
जपानमध्ये सुमारे ४८% लोक शिंटो धर्माचे पालन करतात. शिंटो हा जपानचा स्थानिक धर्म आहे. तर ४६% लोकसंख्या बौद्ध धर्माचे पालन करते. उर्वरित ५% लोकसंख्या इतर धर्मांचे पालन करते. त्यात ख्रिश्चन, इस्लाम, यहुदी आणि हिंदू धर्म असे इतर धर्म आहेत. २००५ मध्ये इस्लाम समर्थकांची लोकसंख्या १ लाख १० हजार होती; २०२३ मध्ये ती ३ लाख ५० हजारांपर्यंत पोहोचली. त्यामुळे जपानी वंशाच्या लोकांमध्ये निश्चितच त्यांच्या संस्कृतीबद्दल चिंता देखील वाढली.