राज्याचे 'पार्किंग' धोरण लवकरच आणण्यात येणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Total Views | 11

Parking policy to be intoduced in state


मुंबई : वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी "एकात्मिक पार्किंग धोरण "आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये(MMRDA) करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे परिवहन विषयक मुद्द्यांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. अतिरिक्त मुख्य सचिव ( परिवहन) संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह मुंबई महानगर प्रदेशात येणाऱ्या सर्व महापालिकाचे आयुक्त या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले, एकात्मिक पार्किंग धोरण आणण्याअगोदर त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कोणती त्रुटी राहू नये. ज्या महापालिका क्षेत्रामध्ये वाहतूक समस्या जटिल आहे त्या महापालिका आयुक्तांच्या सूचना,अभिप्राय यांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल तर ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रामध्ये अशा पार्किंग जागा विकसित करण्याला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. राज्यासाठी पार्किंग धोरण तयार करत असताना सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या महापालिकांमध्ये प्रभावीपणे राबवावे असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले आहे. त्यानुसार ही बैठक बोलण्यात आली होती.

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यान आणि मैदानाच्या खाली भूमिगत पार्किंगची व्यवस्था निर्माण करावी. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलीस प्रशासन व मोटार परिवहन विभागाच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करावी.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही;

"बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही"; 'या' मुस्लिम बहुल राष्ट्राने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण...

(Muslim Country Morocco Bans Animal Sacrifice on Bakrid) आफ्रिकेतील इस्लामिक देश असलेल्या मोरोक्कोमध्ये बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांच्या कुर्बानी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम बहुल राष्ट्र असलेल्या मोरोक्कोचा राजा मोहम्मद सहावा यांनी हा निर्णय घेतला आहे. इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. मोरोक्कोच्या लोकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे. मोरोक्कोतील पशु बाजार बंद करण्यात आले असून राजाने बकरीसह कोणत्याही प्राण्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121