त्राल : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरातील नादिर गावात १५ मे २०२५ रोजी सकाळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नादिर गावात शोधमोहीम सुरू केली.
ही कारवाई भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केली. या चकमकीत कोणतीही नागरी हानी झाली नाही. सुरक्षा दलांच्या माहितीनुसार परिसरात अजूनही काही दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता आहे.
या कारवाईत ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: आसिफ शेख, निझर वाणी, यावर भाट पोलिसांच्या माहितीनुसार हे तिघेही अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होते आणि त्यांच्यावर विविध गुन्ह्यांचे आरोप होते.
ही कारवाई जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन केलर’चा एक भाग आहे. सुरक्षा दलांनी यापूर्वीही अनेक कारवाया करून दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
या घटने बाबत कश्मिर पोलीसांनी त्याच्या अधिकृत एक्स हॅंडलवर पोस्ट केले.