पाक सैन्याचा खोटारडेपणा पुन्हा उघड! म्हणे, "तो दहशतवादी नव्हेच तो तर साधा मौलवी..."

    12-May-2025   
Total Views | 27
 
Pakistans Lie Exposed LeT Terrorist ID Reveals Hafiz Abdul Rauf s Involvement
 
नवी दिल्ली : (Pakistan LeT Terrorist Hafiz Abdul Rauf) पाकिस्तानी लष्कराचे जनसंपर्क प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत व्हायरल झालेल्या एका दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारातील फोटोविषयी स्पष्टीकरण दिले आहे. ज्यातून पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस आला आहे. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात असलेला व्यक्ती हा लष्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी असल्याचा भारताने दावा केला होता. यावर पाकिस्तानकडून फोटोतील व्यक्ती हा एक साधा कुटुंबवत्सल आणि धर्मप्रचारक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दहशतवाद्यांच्या मृतदेहांवर फातिहा पठण करणारा दुसरा तिसरा कुणी नसून दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ आहे, ज्याला अमेरिकेने २०१० साली जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते.
 
भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर, दहशतवादी तळांवर झालेल्या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले. त्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसह दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ देखील उपस्थित होता. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर पाकिस्तानचे डीजी आयएसपीआर यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. पाकिस्तानच्या  इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या (डीजी आयएसपीआर) डायरेक्टर जनरल यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की ज्या व्यक्तीला दहशतवादी म्हटले जात आहे तो एक सामान्य धर्मगुरू आणि कुटुंबवत्सल माणूस आहे. डीजी आयएसपीआर यांनी त्यांचे राष्ट्रीय ओळखपत्रही दाखवले. नंतर, या ओळखपत्रामुळेच पाकिस्तानी सैन्याचा खोटारडेपणा उघड झाला आणि सत्य बाहेर आले. यामुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संबंध पुन्हा एकदा जगजाहीर झाले आहेत. म्हणूनच आता पाकिस्तानी लष्कराला स्वतःची उरलीसुरली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी अशी खोटी स्पष्टीकरणं द्यावी लागत आहेत. दहशतवाद्यांची ओळख लपवताना पाकिस्तानची दमछाक होत आहे. पण पाकिस्तानी सैन्याने कितीही कांगावा केला तरी त्यांचा खोटारडेपणा समोर येतच आहे. यावरून पाकिस्तान जाणूनबुजून दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
पाकिस्तानी सैन्याचा दावा आणि सत्य
 
डीजी-आयएसपीआरचा दावा आहे की तो प्रत्यक्षात एक साधा कुटुंबवत्सल व्यक्ती आणि धर्मप्रचारक आहे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने ब्रीफिंगमध्ये रौफचे सरकारी ओळखपत्र दाखवले, ज्यामध्ये त्यांची जन्मतारीख आणि ओळख क्रमांक होता आणि दावा केला की ते पंजाब प्रांतीय विधानसभेतील राजकीय पक्ष पीएमएमएलच्या "कल्याण शाखेचे प्रभारी" होते. तथापि, अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या नोंदींआधारे भारतीय गुप्तचर यंत्रणेने पुष्टी केली की, हा तोच हाफिज अब्दुल रौफ होता, ज्याला २०१० मध्ये अमेरिकेने विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी (SDGT) घोषित केले होते. अहवालानुसार, रौफ १९९९ पासून लष्कर-ए-तैय्यबाचा वरिष्ठ कमांडर आहे, जो हाफिज सईदच्या हाताखाली काम करतो.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121