सातारारत्न पुरस्कारासाठी नामाकंंन पाठविण्याचे आवाहन

    26-Sep-2024
Total Views |

सातारा  
 
मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानकडून ‘सातारारत्न’ सन्मानासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठानातर्फे मुंबई, ठाणे नवी मुंबईतील सातारकरांचे स्नेहसंमेलन व दसरा मेळावा १० ऑक्टोबर रोजी दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कीर्तीवंतांचा ‘सातारारत्न’ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. नामांकन पाठविण्यासाठी [email protected] आणि अधिक माहितीसाठी ९९६७९११५५७७\ ९९८७१९९९५६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.