"ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी..." लेखक विक्रम संपथ यांची 'ती' पोस्ट व्हायरल!
पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव!
08-May-2025
Total Views | 179
मुंबई : दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने सुरु केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाक पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्याचा चंग भारताने बांधला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवायचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. इंग्रजी भाषेमध्ये सावरकरांचे द्विखंडात्मक चरित्र लिहीणारे तरुण लेखक विक्रम संपथ यांनी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी झालेल्या भेटीचा उल्लेख केला आहे.
लेखक विक्रम संपथ आपल्या फेसबुकवर पोस्टमध्ये म्हणाले की " ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी दिल्लीमध्ये एका राष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रमांतर्गत, त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली. पंतप्रधानांनी माझ्या आई वडिलांची चौकशी केली. त्यांच्या चेहऱ्यावलर कुठल्याही प्रकारचा तणाव दिसत नव्हता. त्यांच्या नेतृत्वातील हाच गुण शिकण्यासारखा आहे. परिषदेमध्ये मोदींनी दिलेल्या व्याख्यानामध्ये कुठेही भारताच्या शेजारराष्ट्रांचा उल्लेख नव्हता. इंगलंडसोबत झालेल्या यशस्वी कराराचा उल्लेख त्यांनी उल्लेख केला. यानंतर काही तासातच 'ऑपरेशन सिंदूर'ला सुरुवात झाली." असे म्हणत त्यांनी पंतप्रधनांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
जगभरातून भारताला पाठिंबा!
भारताने पाकिस्तान तथा पाकव्यापत काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. दहशतवादाविरोधात पुकारलेल्या या लढाईला आता जगभरातील बलाढ्य देशांनी पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिका, जपान, रशिया, इस्रायल, अर्जेंटिना आणि फ्रान्स या देशांनी पाठिंबा दर्शवला आहे.