राष्ट्र परमो धर्म:

    11-Jun-2024
Total Views |
Sangh Shiksha Varg 2024
 
नाशिक येथे दि. २३ मे ते दि. ६ जून या कालावधीत रा. स्व. संघाचा ‘संघ शिक्षा वर्ग विशेष २०२४’ पार पडला. या वर्गामध्ये सहभागी झालेल्या योगेश देशपांडे यांनी त्यानिमित्ताने केलेले अनुभवकथन...

नाशिक येथील रास्वसंघाच्या संघ शिक्षा वर्गामध्ये सर्व अंगानी परिपूर्ण असे बौद्धिक व शारीरिक शिक्षण लाभले. आमचे गणशिक्षक प्रकाश कुलकर्णी म्हणजे आमच्यातीलच, मनमिळाऊ! वर्गकार्यवाह कैलाश गोयल यांची सर्वांना समजावून सांगण्याची पद्धत विशेष उल्लेखनीय. त्यांनी सांगितलेले शब्द अजूनही लक्षात आहेत.
 
वर्ग ही एक साधना आहे॥ मी एक साधक आहे ॥

वर्गपालक अनिल जोशी यांची शिस्त लक्षात राहणारी. दररोज सकाळी एकात्मता मंत्रपठणासाठी संपद करताना शिक्षक आमच्या आधी बाजूला बसलेले मी १५ दिवस दररोज बघितले. पं. मा. प्रांतप्रमुख सुधीर पाचपोर आणि अनिल वाळिंबे यांचे आमच्या सर्वांवर विशेष लक्ष आणि त्यांचे प्रत्येक बारिकसारिक गोष्टीत सहकार्य मिळतच असते. सुधीर यांच्या आवाजातील मधुर आणि मंत्रमुग्ध करणारी प्रार्थना संघाचे विश्वरुप दर्शन घडवते. विष्णू शिक्षकांची गण घेताना असलेली कडक शिस्त कायम लक्षात राहील. वर्गात असताना दि. २ मे रोजी पुणे महानगराचे शा. शि. प्र. धनंजय जोशी यांचे मिळालेले पत्र! त्या वेळेस आनंदाने डोळे भरून आले. जुन्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या.यावेळी आमचे चर्चाप्रवर्तक अशोक गिरी शिक्षक यांचा प्रत्येकाला बोलते करण्याचा हातखंडा होता. या चर्चासत्रामध्ये केलेले चिंतन मोलाचे होते. त्याचे सार होते-

स्वस्मै स्वल्पं समाजाय सर्वस्वं। सेवा परमो धर्मः।

 
हा मंत्रच जीवनाचा गाभा आहे. याविचारांनी मनाला उजळून टाकले. असो, व्यवसायी प्रशिक्षण ही या वर्गाची विशेष बाब. हिंदू संघटन, हिंदू संस्कृती, भारताला परमवैभवाकडे नेण्यासाठी असलेले विषय, व्यक्तिनिर्माण. हे सर्व विषय अंतर्भूत जरी असले, तरी Management life lesson, life leadership आणि समाजामधील विविध गोष्टींचे शिक्षण या सर्वच गोष्टी वर्गात शिकायला मिळाल्या. म्हणून हा वर्ग माझ्यासाठी विशेष होता. अ. भा. अधिकारी विजयकुमार यांचे जिज्ञासा सत्रामधील मुद्दे कायम लक्षात राहतील. विठ्ठल कांबळे शिक्षकांनी मांडलेला सामाजिक परिवर्तन विषय विशेष महत्त्वाचा वाटला. गतिविधी, जागरण हे नवीन संघाचे आयाम यावर खूप काम करणे गरजेचे वाटले. प. मा. प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव शिक्षक आधी खूपवेळा भेटलो असलो, तरी वर्गात त्यांना बघून झालेला आनंद वेगळाच होता. निलेश गद्रे शिक्षकांनी मांडलेला सामाजिक समरसता विषय मांडला.


ते म्हणाले, पूर्वी भारतामध्ये जातीपाती हा विषय कधी नव्हताच, विभागणी व्हायची ती व्यक्ती किंवा तो काहीजणांचा समूह काय काम करतो, यावरून. people have different skillsets आणि तीच त्यांची ओळख. सगळे समसमान! आज हिंदू म्हणून एकत्र राहणे आणि जगणे आवश्यक आहे. मात्र समाजात काही विघातक शक्ती हिंदूमध्ये फुट पाडण्याची कारस्थाने रचत आहेत. त्या अनुषंगाने सामाजिक समरसता या विषयाचा समाजात योग्य प्रचार आणि प्रसार करणे महत्त्वाचे आहे असे वाटते. शेवटच्या बौद्धिक सत्रामध्ये यशोवर्धन वाळिंबे शिक्षकांनी (अण्णांनी) संदर्भ देत सांगितलेली पू. गुरूजींची गोष्टी आणि पू. गुरूजींनी ’आबा प्रार्थना ऐकू येत आहे का?’ हा आबांना विचारलेला प्रश्न मनावर कोरला गेला. तसेच पुढे मा. संजय अगरवाल यांचे मनोगत आणि त्या वेळचा भावूक क्षण! तो क्षण कायम मनात राहील. लिहिण्यासारख्या बर्‍याच गोष्टी, काय लिहावे सर्वच उत्तम.
 
आम्ही बि घडलो तुम्ही बि घडा ना...

या पद्याप्रमाणे, संघरुपी सागरामध्ये माझ्यासारख्या असंख्य नदीरुपी स्वयंसेवकांना राष्ट्रहितासाठी घडवून संघ खरेच खूप मोठे काम करीत आहे. शाखा हे संस्कारांचे मंदिर, तसेच समजाभिमुख, समाजासाठी, समाजामध्ये काम हेदेखील संघाचे उद्दिष्ट वर्गातून प्राप्त झाले. तसेच समाजाभिमुख काम करण्याचे बळ आणि ऊर्जा या वर्गातून मिळाली असे वाटते.

गुरूने दिलेला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा ....

या गीताप्रमाणे सर्व शिक्षकांना असा विश्वास द्यावासा वाटतो की, तुम्ही दिलेली ही शिकवण आम्ही अशीच पुढे चालवू. यात कधीही खंड पडणार नाही.

योगेश देशपांडे