‘तीच्यावर बोलू काही’ ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चा समाजजागृतीचा एक सेवाध्याय

    28-May-2025
Total Views |
 
tichyavar bolu kahi foundation
 
‘तीच्यावर बोलू काही’ ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चा ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चा ‘किशोरी विकास प्रकल्प’ आणि ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ यानिमित्त उपक्रम म्हणजे किशोरवयीन परिवर्तनाची नांदीच. मासिक पाळी आणि किशोरी विकासाचा समग्र प्रवास यांवर भाष्य करणारी ‘तीच्यावर बोलू काही’ या विषयावरची वक्तृत्व स्पर्धा आणि एकंदर किशोरवयीन मुलींसदर्भातल्या कामाचा आढावा घेणारा हा लेख.समाजजागृतीचा एक सेवाध्याय
 
28 मे - जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’आयोजित करत असलेल्या ‘तिच्यावर बोलू काही’ या वक्तृत्व स्पर्धेचा हेतू स्पष्ट आहे, मासिक पाळीसारख्या नैसर्गिक प्रक्रियेवर खुलेपणाने, आत्मविश्वासाने आणि आदराने संवाद घडवणे. ही स्पर्धा केवळ भाषणाचा कार्यक्रम नसून एक व्यापक सामाजिक आंदोलनाचा भाग आहे, जो ‘किशोरी विकास प्रकल्पा’च्या दीर्घकालीन कार्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.
 
किशोरी विकास प्रकल्प
एक दहा वर्षांचा सशक्त प्रवास
 
‘सेवा सहयोग फाऊंडेशन’अंतर्गत सुरू झालेला ‘किशोरी विकास प्रकल्प’ आज महाराष्ट्रात एक परिवर्तनकारी उपक्रम म्हणून ओळखला जातो. पुणे येथून सुरू झालेला हा प्रकल्प आज मुंबई, पालघर, वाडा, नवी मुंबई, कर्जत आणि ठाणे या सहा विभागांमध्ये विस्तारलेला असून एकूण 53 किशोरी वर्ग चालवले जात आहेत आणि 1 हजार, 200 हून अधिक किशोरी मुली या उपक्रमाशी प्रत्यक्ष जोडलेल्या आहेत.
 
किशोरी वर्ग सशक्तीकरणाची कार्यशाळा
 
12 ते 18 वयोगटातील मुलींना लक्षात घेऊन किशोरी वर्गांमध्ये विविध सत्रांचे आयोजन केले जाते.
 
स्व-ओळख व आत्मभान
 
ताणतणाव व्यवस्थापन व अभ्यास कौशल्यसोशल मीडिया व प्रेम-मित्रत्वावर चर्चासत्रेलैंगिक आरोग्य, आहार आणि व्यसनमुक्ती
यासोबतच, दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी शिबीर, रक्त तपासणी आणि जनरल हेल्थ चेकअप घेतले जातात. गरज भासल्यास पोषणाहारासंबंधी मार्गदर्शन केले जाते.महानगर गॅसचे तीन वर्षांचे आर्थिक सहकार्य : एक आधारस्तंभ
महानगर गॅस यांसारख्या संस्था प्रकल्पाचे महत्त्व जाणून सहर्षपणे सहकार्य करत आहेत. 20192022 या कालावधीत विभागांची संख्या चारवरून सातपर्यंत गेली आणि किशोरी संख्या 400 वरून 1 हजार, 496 पर्यंत वाढली. प्रत्येक वर्षी किशोरी उत्सव, आरोग्य तपासणी, साहित्यवाटप, लाठीकाठी प्रशिक्षण, वक्तृत्व व पथनाट्य स्पर्धा यांचे आयोजन यशस्वीरित्या होत आले आहे.
 
प्रकल्पाचे ठळक उपक्रम व वैशिष्ट्ये
 
लाठीकाठी प्रशिक्षण : मुलींना स्वसंरक्षणाची ताकद मिळवून देण्यासाठी
किशोरी उत्सव : स्नेह, संवाद आणि संस्काराचा अनोखा संगम
किशोरी पूजन : किशोरवयीन अवस्थेचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम
‘माझी आई, माझी जोडी’ स्पर्धा : आई-मुलीमधील संवाद वृद्धिंगत करण्यासाठी
किशोरी किटवाटप : स्वच्छता आणि प्राथमिक आरोग्य साधनांचा समावेश.
पथनाट्य स्पर्धा : विविध सामाजिक समस्यांवर पथनाट्यातून जनजागृती
आरोग्य आहार लैंगिक शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास विषयावर विविध माहितीपर स्तर
40 सत्रचा अभ्यासक्रम : डछऊढ विद्यापीठाकडून अभ्यासक्रमास मान्यता
आठवड्यातून दोन तास किशोरी मुलींच्या विकासासाठी
 
सेवा स्वास्थ्य प्रकल्प आरोग्य दृष्टिकोनातून विस्तार
 
‘सेवा स्वास्थ्य प्रकल्प’ हा उपक्रम किशोरी विकासाच्या पुढील पायरीवर नेणारा ठरला. माहुल भागातील दहा वस्तींमध्ये राबविलेल्या उपक्रमांमध्ये 900 पेक्षा अधिक लाभार्थी होते, किशोरवयीन मुले, मुली व पालक. स्वच्छता, मानसिक आरोग्य, पोषण, पर्यावरण जागरूकता, प्रतिबंधात्मक औषध यांवर सत्र राबवले गेले.
 
परिवर्तनाची झलक किशोरी ते किशोरी प्रमुख
 
हर्षाली बरफ यांसारख्या मुलींनी किशोरी वर्गातून नेतृत्वाच्या भूमिकेत प्रवेश केला. त्या आज ‘किशोरी प्रमुख’ आहेत. हे परिवर्तन सामाजिक गुंतवणुकीचे मूर्त स्वरूप आहे.
 
समारोप : मासिक पाळी लाजेचा विषय नव्हे, जागृतीचा आधार
 
‘तिच्यावर बोलू काही’ स्पर्धा ही केवळ स्पर्धा नाही, ती संवाद-संस्कृतीची चळवळ आहे. मासिक पाळीविषयी उघडपणे बोलणे, किशोरी वर्गातून मुलींना शिक्षित करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे, हेच या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चा हा प्रयत्न अनेकांना प्रेरणा देणारा आहे, कारण हा आहे मन, मेंदू आणि मनगटाचा समन्वय घडवणारा प्रकल्प.
 
- आरती नेमाणे 
(लेखिका सेवा सहयोग फाऊंडेशन, किशोरी विकास प्रकल्पाच्या व्यवस्थापक आहेत.)