माझं शरीर तुरुंगात आहे! आत्मा जनतेसोबत आहे, केजरीवालांचा संदेश

    28-Mar-2024
Total Views |
Delhi CM ED Arrested liquor scam



नवी दिल्ली :     दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली असून राज्याचा कारभार सध्या कोठडीतूनच सुरू आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी जेलमधून एक संदेश पाठविला असून ते म्हणाले, 'माझं शरीर तुरुंगात आहे, परंतु, माझा आत्मा जनतेसोबत आहे. त्यांनी जनतेला आवाहन करत म्हटले की, तुम्ही डोळे बंद करा, मी तुम्हाला तुमच्या अवतीभवती असल्याचे जाणवेल, असा मुख्यमंत्र्यांचा संदेश पत्नी सुनीता केजरीवाल यांनी जनतेला दिला आहे.


हे वाचलंत का? - 'या' सहा जागांवर बिनविरोध निवडणूक! भाजपचाच विजय


सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांना मधुमेह असून त्यांची शरीरातील साखरेची पातळी ठीक नाही. तरीही त्यांचा निर्धार पक्का आहे. केजरीवाल मला म्हणाले की, दोन वर्षांत अडीच हजार छापे टाकूनही ईडीला एक पैसाही मिळाला नाही. तसेच, दि. २८ मार्च रोजी मुख्यमंत्री सदर मद्य घोटाळा पुराव्यासह न्यायालयात उघड करणार आणि सांगणार पैसा कुठे आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.


पत्नी सुनीता यांनी घेतली केजरीवालांची भेट


पत्नी सुनीता केजरीवाल यांनी दि. २६ मार्च रोजी सायंकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी ईडी कार्यालयात गेल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांच्याकडे दिल्लीतील जनतेला दोन महत्त्वाचे संदेश पाठवले. मुख्यमंत्र्यांचा संदेश प्रेसच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवताना त्या म्हणाल्या, 'मी मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यांना मधुमेह असून त्यांची शुगर लेव्हल ठीक नाही पण त्याची जिद्द मजबूत आहे.




दरम्यान, केजरीवाल ईडी कोठडीतून आपल्या मंत्र्यांना आदेश देत असून यावर भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयीन सुनावणीत मुख्यमंत्र्यांच्या ईडी कोठडीतून सरकार चालविण्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने दिल्लीत निदर्शने केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांच्यासह अनेक नेत्यांनी निदर्शनांमध्ये भाग घेतला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत, अशा स्थितीत त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा. मात्र, अरविंद केजरीवाल अजूनही आपल्या पदावर आहेत. त्यामुळे त्यांन पदाचा लोभ असून ते असुरक्षित समजत आहेत, असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी लगावला.