वसई ः अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आणि आम्ही सारे, वसई यांच्यावतीने कै. निरज जड स्मृती प्रित्यर्थ एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे ९ वे वर्ष असून ही स्पर्धा मराठी आणि हिंदी या दोन भाषांमधून होणार आहे. रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी जिमखाना, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई (प.)येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही स्पर्धा होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशांत (८४४६४८०६४१) किंवा रोहन (९६६५१७०५२५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.