अवास्तव खर्च टाळण्यासाठी सीरवी समाजाचा पुढाकार ; लग्नसमारंभासाठी नवी नियमावली जाहीर

    22-May-2023
Total Views |
Marwadi (Marwari) And Rajput Wedding Ceremony, Rituals And Customs – Indian  Weddings 
 
मुंबई : लग्न समारंभ हा १६ संस्कारांपैकी एक मानला जतो. परंतु त्या संस्काराचे विद्रुपीकरण अनेक ठिकाणी केल्याचे आढळून येते. बदलत्या कालानुरूप लग्नसमारंभात विविध विधी व त्यासाठी वेगवेगळे समारंभ आयोजित करण्यात येतात. मात्र हा केवळ पैशांचा अपव्यय असल्याने लग्न संस्कारात गरज नसलेल्या इतर विधींना बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय राजस्थानातील सीरवी समाजाने घेतला आहे.
 
लग्नसमारंभात डीजे, मेहंदीचा कार्यक्रम तसेच लग्नापूर्वी होणारे प्रीवेडिंग शूट यावर या समाजाने बंदी घातलीय आहे. त्याचबरोबर लग्नापूर्वी मुलं मुलीला भेटून एकत्र बाहेर जाण्यावरही बंदी घालण्यात आलेली आहे. लग्नविधीतील एक अत्यंत महत्वाचा संस्कार, हळद, या हळदीच्या कार्यक्रमावरही बंदी घालण्यात आलेली आहे.
 
हे सर्व विधी कालानुरूप आलेले असून यातील काहीही परंपरागत नाही. तसेच हे सर्व संस्कृतीच्या विरोधात आहे. राजस्थानी समाजात वरची मिरवणूक काढली जाते. ही महत्वाची परंपरा आहे, मात्र आज अनेक वर दाढी वाढवून मिरवणुकीत सामील होतात. यापुढे वरानी बोहल्यावर उभे राहताना दाढी भादरून संपूर्ण मुंडन करणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास त्याची मिरवणूक काढली जाणार नाही. असाही आदेश या समाजाच्या नियमावलीत समाविष्ट कारण्यातआला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.