गिरीश ओक यांनासर्वोत्कृष्ट अभिनयाचे २ पुरस्कार

    30-Mar-2023
Total Views |

girish oak 
 
सर्वोत्कृष्ट अभिनयाची दोन्ही पारितोषिके मिळाल्यानंतर अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी दिली प्रतिक्रिया. गिरीश म्हणाले, "माझा प्रतिस्पर्धी मीच असं इतर कोणाच्या बाबतीत झालंय की नाही मला माहीत नाही पण माझ्या बाबतीत तरी पहिल्यांदा झालं. सध्या माझी दोन नाटकं सुरू आहेत '३८ कृष्ण व्हिला' आणि 'काळी राणी' झी नाट्य गौरवला ह्या दोन्ही नाटकांसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून मला नामांकन मिळालं. दोन विरुध्द टोकाच्या भूमिका माझ्या माध्यमातून एक मेकींसमोर उभ्या ठाकल्या. आणि काल चक्क दोन्ही भूमिकांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. मला कळंतच नाहिये मी माझ्या कुठल्या भूमिकेचं अभिनंदन करू ते. आता तुम्हीही विचाराल तुम्हाला कोणत्या भूमिकेसाठी हवं होतं ? पण असं नाही नं सांगता येत एका भूमिकेचं नाव घेतलं तर दुसरी भूमिका माझ्यावर नाराज होणार आणि मलाच दोन्ही भूमिकांचे अजून खूप प्रयोग करायचे आहेत. '३८' चे १२५ होत आले आहेत 'काळी राणी' चे ५० फक्त."
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.