तुतारीची वाजंत्री आहे किती पाताळयंत्री! चित्रा वाघ यांचा रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळेंवर घणाघात

    03-Jul-2025   
Total Views |

मुंबई
: शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या माजी पीएच्या पत्नीने तिचा छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला. तुतारीची वाजंत्री आहे किती पाताळयंत्री अशी टीका त्यांनी केली.

रोहिणी खडसे यांचा पीए राहिलेल्या पांडुरंग नाफडे याच्याकडून पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप पांडुरंग नाफडेच्या पत्नीने केला आहे.

यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "सुप्रिया सुळे, बघताय ना तुमच्या वाजंत्रीची करामत. तुम्ही ती महिला अत्याचार विरोधात रॅली काढणार असं ऐकलं होतं. पण त्याआधी यांचा बंदोबस्त करा. पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे हा या वाजंत्रीचा स्वीय सहाय्यक आहे. हा नाफडे जो आहे तोदेखील साधासुधा नाही. कुठल्यातरी घोटाळ्यात तो फरार आरोपी होता. इतकंच नाही तर तो आपल्या पत्नीचा अतोनात छळ करतो. स्वतःच्या मुलीला सांभाळतदेखील नाही. वारंवार पत्नीच्या घरच्यांकडे पैशांची मागणी करतो."

"यावर वाजंत्रीताई भलतीच टेप वाजवतात. आपल्या मुजोर स्वीय सहाय्यकाची बाजू घेत, त्याच्या पिडीत पत्नीलाच धमक्या दिल्या जाताहेत. आज त्याच्या पत्नीने सगळं मीडियासमोर येऊन सांगितलं आहे. तिच्या हिंमतीला दाद. ताई तू काळजी करू नकोस तू खंबीर रहा. मग वाजंत्री असो किंवा कोणी नगारा. तू घाबरू नकोस. पोलिस तुझ्या रक्षणासाठी आहेत त्यांना संपर्क कर. राज्याचे मुख्यमंत्री आपले देवाभाऊ आणि त्यांचे महायुती सरकार राज्यातील प्रत्येक लाडक्या बहीणींच्या मागे सक्षमपणे उभे आहे," असे त्या म्हणाल्या.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....