ठाण्याचे नाव उज्ज्वल करणार्‍या कर्तृत्ववान ‘चारचौघीं’चा सन्मान

‘ठाणे डिस्ट्रीक्ट हौसिंग फेडरेशन’ने घेतली विशेष दखल

    13-Mar-2023
Total Views |
Thane District Housing Federation
 
 
ठाणे :असामान्य कर्तृत्वाने ठाणे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणार्‍या कर्तृत्ववान ’चारचौघीं’चा ‘ठाणे डिस्ट्रिक्ट हौसिंग फेडरेशन’च्यावतीने नुकताच सन्मान करण्यात आला. फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद फेडरेशनच्या संचालिका विद्या चौधरी यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून साहा. निबंधक यशवंती मेश्राम, सहकार अधिकारी श्रेणी-१ अनिता बटवाल यांची उपस्थिती होती.


या कार्यक्रमात काश्मीर ते कन्याकुमारी ३ हजार, ७१० किमी इतका सायकल प्रवास २८ दिवसांत पूर्ण करणारी बाळकुम येथील ११ वर्षीय सई पाटील, एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल १२ किमींचे अंतर पोहून पार करणारी कल्याण येथील दहा वर्षीय अनंका गायकवाड, कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी कळवा, विटावा येथील वैशाली तांडेल आणि १२ हजार, ५०० फूट उंच केदारकंठ शिखर सर करणारी स्नेहांकिता सावंत या चारचौघींचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.