म्हणून ‘मी गुगल पे वापरणे बंद केले’...; सानिया मिर्झाच्या बहिणाचा UPI अॅप्स वापरण्याविरुद्ध सल्ला!

    28-Jun-2025
Total Views | 23
 
 
मुबंई : भारताची बँडमिंटनपटू सानिया मिर्झाची बहीणी अनम मिर्झाने सोशल मीडीयावर पोस्ट करत UPI अॅप्स वापरण्याविरुद्धचा सल्ला आपल्या फॉलोवरना दिला आहे. अनमने इंस्टाग्रामवर असा खुलासा केला आहे की, तिने गुगल पेसह UPI अॅप्स वापरणे बंद केले आहे. अनमने पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती म्हणते की, "यावर्षी पासून मी गुगल पे वापरणे बंद केले, मी माझे यूपीआय अकाउंट रिकामी करून, माझ्या फोनमधील सर्व यूपीआय अ‍ॅप्स मी डिलीट केले आहेत." यातून अनमच्या मते, ती तीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यात अधिक सक्षम झाली आहे.
 
"यूपीआय अ‍ॅप्स मी डिलीट केल्यांनतर सुरवातीचे काही दिवस हे माझ्यासाठी कठीण होते. परंतू आता त्याची सवय झाल्याचे तिचे म्हणणे आहे. अनम म्हणाली की,UPIअ‍ॅप्स मी डिलीट केल्याने माझे पैसे कुठे जात आहेत याची अधिक जाणीव मला होत आहे. ज्याने माझी अधिक बचतसुद्धा होत आहे." असे अनम म्हणाली.
 
भारतात 'यूपीआय'च्या माध्यमातून किती कोटींचे व्यवहार?
 
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) नुसार, मे २०२५ पर्यंत भारतातील जवळपास ६७३ बँका यूपीआयवर सक्रिय आहेत. जिथून २५ लाख कोटींपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार 'यूपीआय'च्या माध्यमातून केले जातात. यूपीआय इकोसिस्टममध्ये भारतात प्रति मिनिट सुमारे ५,००० यूपीआय व्यवहारांसह एसबीआय बँक ही आघाडीवर आहे. तर प्रति मिनिट १,५०० यूपीआय व्यवहारांसह एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121