डोंबिवलीत मॅथ्स सर्कलचे उद्घाटन

    28-Jul-2025
Total Views | 6

डोंबिवली : रेझिंग मॅथेमॅटिशन फाऊंडेशन आयोजित व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी प्रायोजित तसेच राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवलीच्या पुढाकारने स्थापन केलेल्या मॅथ्स सर्कल चे नुकतेच मोठय़ा उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद शाळांच्या सर्व शाखा व इतर शाळांमधून गणितामध्ये रुची असणाऱ्या 1700 विद्यार्थ्यांमधून चाचणी घेऊन निवडक विद्यार्थ्यांची निवड मॅथ्स सर्कल मध्ये केली गेली. प्रत्येक शनिवारी वर्षभर गणितातील तज्ञ या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणार आहे. तसेच गणिताची व ऑलिंपियाडसाठी तयारी करून घेतली जाणार आहे. मॅथ्स सर्कलच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, कार्यवाह शिरीष फडके, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटीच्या अध्यक्ष सविता नाझरे, रेझिंग मॅथेमॅटिशन

फाऊंडेशनचे को फाउंडर विनय नायर, सदस्य केदार पेणकर, प्रसाद तांबे, शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष गजानन पाटील, स्वामी विवेकानंद शाळा इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका वैभवी सावंत, रोटरी क्लब डोंबिवली सिटीचे सेक्रेटरी मंदार भिसे, सदस्य विजयकुमार नाझरे, आशिष देशपांडे,प्रोजेक्ट चेअरमन संतोष नाबुद्री, बिंदू नाबुद्री, अभिजीत पंडित उपस्थित होते.

सविता नाझरे यांनी सांगितले, विद्यार्थ्याच्या गणितीय अभ्यासासोबत व्यक्तीमत्त्व विकासासाठी हा उपक्रम रोटरी क्लबने प्रायोजित केला असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहान केले.

संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले, मॅथ्स सर्कल राबवणारी राष्ट्रीय शिक्षण संस्था ही देशातील एकमेव मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेणारी संस्था आहे. आणि संस्था विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121