मुंबई : "हिंदुत्वाच्या वाढत्या प्रभवामुळे संपूर्ण देश नवउत्थानाकडे वाटचाल करत आहे. राष्ट्रजीवनाचे प्रत्येक क्षेत्र प्रगतीपथावर आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारताकडे आता एका आशेच्या किरणासारखे पाहिले जात आहे", असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केले. उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
माध्यमांना संबोधत ते म्हणाले, समाजाला अवैध धर्मांतराच्या कलंकापासून मुक्त करून हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. धर्मांतर करणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्या आणि इस्लामिक जिहादी घटकांनीही हे समजून घेतले पाहिजे की, त्यांच्या अपवित्र कारस्थानांना आता यश मिळणार नाही. अयोध्येमधील रामलल्लाच्या भव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा ही संपूर्ण जगात नवीन चेतना व ऊर्जा निर्माण करणारी घटना ठरली. जिहादी आतंकवाद व नक्षलवादावर नियंत्रण आणि देशातील शत्रूंना स्वदेशी तंत्रज्ञानाने दिलेल्या प्रत्युत्तराने प्रत्येक भारतीयाला आपल्या मजबूत सरकार आणि सक्षम नेतृत्वाचा अभिमान वाटतो आहे.
अवैध धर्मांतराच्या घटनांना पूर्णविराम लागायला हवा, यावर बोलताना ते म्हणाले की, देशातील अनेक राज्यांत कठोर धर्मांतरविरोधी कायदे असूनही चर्च आणि जिहादी संघटना अजूनही भोळ्याभाबड्या हिंदूंना फसवून जबरदस्ती धर्मांतरण करत आहेत. त्यामुळे लव्ह जिहाद आणि अशा प्रकारच्या सर्व घटनांवर पूर्णविराम लागायलाच हवा, अन्यथा समाजही अशा प्रवृत्तींना योग्य प्रत्युत्तर देईल. चर्च आणि मुस्लिम संघटनांनीही यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
कांवड यात्रा – राष्ट्रभक्तीचे प्रतीक
कांवड यात्रा ही अनेक शतकांपासून राष्ट्रभक्ती, एकता, समरसता आणि पर्यावरण रक्षणाचे प्रतीक राहिली आहे. शिवभक्त हिंदू जेव्हा पवित्र नद्यांचे जल घेऊन, जमिनीवर न ठेवता, सात्विक भावनेने, शेकडो किलोमीटरची यात्रा करून शिवालयात पोहोचतो, तेव्हा हे जल समाजातील समरसतेचे आणि राष्ट्रीय एकतेचे अमृत बनते. या यात्रेत जात, भाषा, वेशभूषा, प्रांत यांचे सर्व भेद संपून सर्वांची एकच ओळख उरते, ती म्हणजे ते हिंदू आहेत आणि भोले बाबांचे भक्त आहेत. परंतु, काही जिहादी मानसिकतेचे लोक आपली हलाल प्रवृत्ती सोडत नाहीत. लपवलेली ओळख ठेवून ते "थुंक जिहाद" आणि "मूत्र जिहाद" सारखे कुत्सित प्रकार करतात, जे हिंदू समाज आता सहन करणार नाही." असे स्पष्ट मत सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केले.