देशातभरात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत; कुठे 'मृत्यू' तर कोण 'बेपत्ता'...!

- दरवर्षीपेक्षा १२% जास्त पाऊसाची नोंद

    28-Jun-2025
Total Views |

Rains update india
 
मुंबई : देशभरात सध्या विविध राज्यात पावसाची जोरदार बँटीग सुरू आहे. पावसाच्या हाहाकाराने काही राज्यांत जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा १२% जास्त पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे २६ जूनपर्यंत देशभरात १३४.३ मिमी पाऊस पडणे आवश्यक होते. परंतू आतापर्यंत १४६.६ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.
 
१२% जास्त झालेल्या पाऊसाचा तडाखा हा मोठ्याप्रमाणात उत्तराखंड राज्याला बसला आहे. मुसळधार पावसाने रस्त्यावंर पाणि साचून केदारनाथ मंदिराकडे जाणारा महामार्ग पुन्हा एकदा बंद झाला आहे. केदारनाथ येथे अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक घटनास्थळी उपस्थित आहे. जंगलातील पर्यायी मार्गांने प्रवाशांना सुरक्षितपणे एनडीआरएफचे जवान बाहेर काढत आहेत.
 
देशात होणाऱ्या ढगफुटीने मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जणांहून अधिक लोक हे बेपत्ता आहेत. हिमाचलच्या स्ट्रो गॅलरी,शिलागड व्हॅली, जिवा नाला, होरानगड , खनियारा धर्मशाळा आणि कांगडा या भागात ढगफुटीने जनजीवन विस्कळीत झाले. जम्मू - काश्मीरमधील कठुआ, पूंछ, राजौरी आणि दोडा जिल्ह्यात ढगफुटीने आलेल्या पुरात २ लहान मुलांसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिथे गुजरातमध्ये सुरतनंतर आता अहमदाबादमध्ये पूराचे पाणी घरांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात सर्व राज्यांमध्ये पावसाची दाट शक्यता असून पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.