मुंबई : सुप्रसिद्ध कलाकार एम एफ हुसेन यांच्या अनेक कलाकृती अनेकदा प्रदर्शनात मांडल्या जातात. शेवटच्या काळात कतार येथे राहत असलेले हुसेन आपल्या उमेदीच्या काळात मात्र मुंबईत वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांनी आपल्या घरातील सर्व फर्निचर कमळाच्या आकारात बनवून घेतले होते. हे सर्व साहित्य सॅफरॉन आर्ट डॉट कॉमचे संस्थापक दिनेश आणि मिनल वझिरानी यांच्या संग्रही आहे. आजपासून त्या कमळाचे हे प्रदर्शन आर्ट मुंबई कलादालन येथे निमंत्रितांसाठी खुले झालेले आहे. दि. १८ व १९ रोजी शनिवारी व रविवारी हे प्रदर्शन सामान्य रसिकांसाठी खुले करण्यात येईल.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवेश शुल्क दीड हजार रुपये इतके आहे तर विद्यार्थ्यांसाठी हे संमेलन सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. या प्रदर्शनात कपात, खुर्च्या, टेबल तसेच पलंग अशा अनेक अमल कलाकृतींचा समावेश केला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या मेम्बर्स कॉन्क्लेव्ह येथे या प्रदर्शनासोबत कलाविषयक परिसंवादाचाही आस्वाद रसिकांना घेता येईल.