बीड प्रकरणातील ६ आरोपींचा रिमांड संपला! १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर

    18-Jan-2025
Total Views | 64

beed 
 
बीड : (Beed Case) बीड प्रकरणात सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सरकारी वकिलांकडून आरोपींच्या एसआयटी कोठडीची मागणी करण्यात आली होती. या मागणीला आरोपींच्या वकीलांनी जोरदार विरोध केला. अखेर न्यायमूर्तींनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
 
यामध्ये आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे या सहा जणांचा समावेश आहे. तसेच यातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या आरोपींपैकी सुधीर सांगळे सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे माजलगाव येथील पोलिस कोठडीत आहेत. तर जयराम चाटे, प्रतीक घुले व महेश केदार हे गेवराई पोलिस कोठडीत आहेत.
 
वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या वकीलांकडून न्यायालयाकडे तारीख वाढवून मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाकडून पुढील तारीख देण्यात आली आहे. जामीन अर्जावरील सुनावणी आता २२ जानेवारी रोजी होणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121