मुंबई : पहलगाम मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सिंदुर ऑपरेशन करुन पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला .सिंदुर ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दबल भारतीय सैन्याचे आणि प्रधानमंत्री नरेद्र मोदींचे अभिनंदन करण्यासाठी तसेच सिंदुर ऑपरेशनचा विजय साजरा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभरात भारत जिंदाबाद यात्रा काढण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.त्यांच्या आवाहनाला देशभरात रिपब्लिकन कार्यकर्त्यांने प्रचंड उस्फुर्त प्रतिसाद दिला.देश भरात अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतिने भारत जिंदाबाद यात्रा काढुन सिंदुर ऑपरेशनचा विजय साजरा करण्यात आला.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात मुंबईत चैत्यभुमी ते इंदु मिल अशी भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली.तसेच पुणे येथे संजय सोनावणे,परशुराम वाडेकर,शैलेश चव्हाण आदिच्या नेतृत्वात भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली.कोल्हापुर येथे उत्तमदादा कांबळे,सांगलीत राजेंद्र खरात,जगन्नाथ ठोकळे,बिड येथे पप्पू कागदे,आदिंनी महाराष्ट्रात भारत जिंदाबाद यात्रा मोठ्या उत्साहात काढली. महाराष्ट्रा सोबत बडोदा,गुजरात,हैद्राबाद,तेलंगणा आणि दिल्ली तसेच देशभरात अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली.तेलंगणा हैदराबाद येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जॉन मस्कू रवी पसुला नागेश्वर राव गोरख सिंह यांच्या नेतृत्वात भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात काढण्यात आली.
बडोदा गुजरात येथे रिपब्लिकन पक्षाचे गुजरात प्रभारी जतीन भुट्टा; गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोक कुमार भट्टी शैलेश भाई शुक्ला; राजेश भाई गोयल; यांच्या नेतृत्वात भारत जिंदाबाद यात्रा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काढण्यात आली. रिपब्लिकन पक्षाच्या भारत जिंदाबाद यात्रेला देशभरात जनतेचा उंदड प्रतिसाद लाभत आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.