कल्याण : भारतीय जनता पक्ष जुने कल्याण मंडळ, कल्याण विकास फाउंडेशन आणि कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कल्याण पश्चिमेच्या अभिनव विद्यामंदिर शाळेमध्ये झालेल्या या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. तत्पूर्वी या शिबिराला प्रारंभ करण्यापूर्वी भाजप कल्याण जुने मंडळ अध्यक्ष अमित धाक्रस आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता नरेंद्र पवार यांच्याकडून सरस्वती माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय दाखले हे अत्यंत महत्त्वाचे समजले जातात. आणि ते वेळेमध्ये मिळणे तर आणखीनच अत्यावश्यक असते. या पार्श्वभूमीवर भाजप कल्याण जुने मंडळ अध्यक्ष अमित धाक्रस, कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमा नरेंद्र पवार यांनी पुढाकार घेत कल्याण तहसील कार्यालयाच्या माध्यमातून हा शासकीय दाखले वाटपाचा उपक्रम राबविला. ज्यामध्ये एकाच ठिकाणी स्थानिक वास्तव्य , डोमिसाइल आणि उत्पन्नाचा असे तीन महत्त्वाचे दाखले मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आयोजक अमित धाक्रस आणि हेमलता नरेंद्र पवार यांनी दिली. ज्याला परिसरातील शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक आणि इतर गरजू व्यक्तींनी मोठी गर्दी केली होती.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा जुने कल्याण मंडल अध्यक्ष अमित धाक्रस, भाजपा जुने कल्याण मंडल महिला मोर्चा अध्यक्षा तथा कल्याण विकास फाऊंडेशन अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली. तर भाजपा नवीन कल्याण मंडल अध्यक्ष स्वप्निल काठे, जुने कल्याण मंडल सरचिटणीस विवेक वाणी, सदा कोकणे, ॲड.समृद्ध ताडमारे, गणेश काळण, एस एस जोशी, वैशाली परदेशी, शैलेश सातवी, रवि गुप्ता, देवस्थळी, जमशेद खान, संजय कारभारी, किशोर म्हसके, किशोर खैरनार, राजेश रजक, प्रविण हेंद्रे, दिपा शहा, प्रणव महाजन, निलेश राजे, सुनिल शेट्टी, उमेश पिसाळ, सुचित्रा होळकर आदींनी या शिबिराला उपस्थिती दर्शवली.
तर कल्याण तहसील कार्यालयातर्फे तलाठी कार्यालय योगेश पुराणिक, भास्कर पाटील, शरद बनसोडे, रियाज तांबोळी, अरुण पाटील आणि दीपाली दाभाडे या कर्मचाऱ्यांनी विनाविलंब हे सर्व दाखले उपलब्ध करून देण्याचे काम केले. त्याबद्दल आयोजकांकडून या कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
अत्यंत महत्त्वाच्या वेळी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल या शिबिराचा लाभ घेतलेल्या संबंधित नागरिकांनी भाजपा जुने कल्याण मंडल अध्यक्ष अमित धाक्रस, भाजपा जुने कल्याण मंडल महिला मोर्चा अध्यक्षा तथा कल्याण विकास फाऊंडेशन अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांचे आभार मानले.