कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुन्हा 'संघ'कार्यात उतरणार!

    21-May-2024
Total Views | 68

Chitta Ranjan Dash

मुंबई (प्रतिनिधी) : (Chitta Ranjan Dash RSS) "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी गेली अनेक वर्ष माझा संबंध आहे. बालपणापासून मी संघ स्वयंसेवक आहे. संघाने माझे चारित्र्य घडवले. आता पुन्हा संघासाठी काम करण्यास मी मोकळा झालो आहे."; असे म्हणत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चित्त रंजन दाश यांनी रा.स्व.संघाचे आभार मानले आहेत. सोमवार, दि. २० मे रोजी कलकत्ता उच्च न्यायालयात चित्त रंजन दाश यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, "आजच्या क्षणी मी माझ्या मनातली गोष्ट सांगू इच्छितो. ज्या संस्थेमुळे मी धाडसी, प्रामाणिक राहणे, इतरांना समान समजणे, देशभक्तीची भावना आणि आपल्या कामाबाबत वचनबद्ध राहायला जिथे शिकलो, त्या रा.स्व. संघाचा मी खूप आभारी आहे. मी संघ स्वयंसेवक कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असेन."

न्यायव्यवस्थेत रुजू झाल्यानंतर चित्त रंजन दाश यांनी स्वतःला संघापासून काही काळ दूर ठेवले होते. मात्र निवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा संघकार्यात सहभाही होण्याचा निर्णय घेतला असून जमेल त्या मार्गाने संस्थेची सेवा करण्याबाबतचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "माझ्या कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी मी कधीही संघाच्या सदस्यत्वाचा वापर केला नाही. माझ्या कारकिर्दीत मी काहीही चुकीचे केलेले नाही म्हणून मी म्हणू शकतो की, मी संघाचा एक भाग आहे."

कोण आहेत न्यायमूर्ती चित्त रंजन दाश?
न्यायमूर्ती चित्त रंजन दाश गेल्या ३७ वर्षांपासून न्यायव्यवस्थेत कार्यरत होते. गेली १५ वर्ष ते उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. कलकत्ता उच्च न्यायालयाचे ते तिसरे ज्येष्ठ न्यायाधीश होते. यापूर्वी ते ओरिसा उच्च न्यायालयात न्यायाधीशही राहिले आहेत. तसेच ते ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय न्यायाधीशही राहिले आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121