मुंबई हायकोर्टाच्या नवीन इमारतीसाठी सप्टेंबरपर्यंत जमीन द्या

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

    21-May-2024
Total Views | 34

high court

मुंबई, दि.२१: प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी भूखंडाचा पहिला भाग सप्टेंबरअखेर सुपूर्द करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला प्रयत्न करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार दि.१७ मे रोजी दिले आहे. सरन्यायाधीश (CJI) डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, संपूर्ण जमीन हस्तांतरित करण्यासाठी वर्षअखेरीपर्यंत प्रतीक्षा करण्याची गरज नाही आणि उपलब्ध असल्यास छोटे भूखंड दिले जाऊ शकतात.
पुढे न्यायालयाने म्हटले आहे की, “आम्ही महाराष्ट्र सरकारला सप्टेंबर २०२४च्या अखेरीस जमिनीचा पहिला भाग म्हणून ९.६४ एकर भूखंड ताब्यात देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश देतो. महाराष्ट्र सरकारला संपूर्ण ९.६४ एकर जमीन देण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही आणि छोटे भूखंडही सुपूर्द करता येतील. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत ९.६४ एकर जमीन ताब्यात देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.
बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठक्कर आणि इतर बार कौन्सिल सदस्यांनी हायकोर्टासाठी तातडीने नवीन इमारतीची गरज असल्याच्या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालय स्वत:च्या अधिकारक्षेत्रांतर्गत खटल्याची सुनावणी करत आहे. मुंबई उच्च न्यायालयाची सध्याची इमारत १५० वर्षे जुनी आहे. दाव्याचे शीर्षक 'मुंबई उच्च न्यायालयाची हेरिटेज इमारत आणि उच्च न्यायालयासाठी अतिरिक्त जमिनीचे वाटप' असे होते.
सर्वोच्च न्यायालयाला याआधी कळवण्यात आले होते की, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या वांद्रे पूर्व, मुंबई येथील जमिनीसाठीचा प्रस्ताव मंजूर केला आहे, परंतु जमिनीच्या काही भागावर सरकारी निवासी वसाहत आहे.
शुक्रवारी महाराष्ट्राच्या महाधिवक्ता यांनी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी डिसेंबरची अंतिम मुदत पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले होते. ते म्हणाले की हा एकात्मिक विकासाचा भाग आहे आणि सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. यावर न्यायालयाने म्हटले, “तुम्हाला योजना बनवण्यासाठी वाट पाहण्याची आवश्यक नाही. निवडणूक आयोग तुम्हाला सूट देईल. तुम्ही सप्टेंबरपर्यंत ९.६४ एकर जमीन चिन्हांकित करा." या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जुलै रोजी होणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
समर्पित नेतृत्वाच्या वाढदिनानिमित्त ‘‘सेवाभावी आदर्श’’- भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना - मुख्यमंत्री सहायता निधीत ५ लाख रुपयांची मदत

समर्पित नेतृत्वाच्या वाढदिनानिमित्त ‘‘सेवाभावी आदर्श’’- भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना - मुख्यमंत्री सहायता निधीत ५ लाख रुपयांची मदत

‘‘महाराष्ट्र सेवक..’’ या समर्पित भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा वाढदिवस साधेपणाने आणि विधायक उपक्रमांनी व्हावा, असे आवाहन पक्षाने केले. त्याला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात महारक्तदान शिबीर होत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 8 ठिकाणी रक्तदान महाअभियान होणार आहे. सेवाभावी भूमिकेतून होणार हा वाढदिवस निश्चितच आदर्शवत आहे, अशी भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121