"निज्जरच्या हत्येत आमचा सहभाग असल्याचे पुरावे द्या"; भारताची कॅनडाकडे पुराव्यांची मागणी
05-Nov-2023
Total Views | 60
नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यातील तणाव पुन्ही एकदा वाढण्याची शक्यता आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसंदर्भात ट्रुडो यांच्या आरोपांवर पुन्हा एकदा पुरावे मागितले आहेत.
निज्जरच्या हत्येमध्ये भारताच्या कथित सहभागाबद्दल कॅनडा किंवा त्याच्या सहयोगींनी भारताला ठोस पुरावे दाखवले नाहीत, असे भारतीय राजदूताने शुक्रवारी द ग्लोब आणि मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. कॅनडाच्या पोलिसांकडून सुरू असलेल्या हत्येचा तपास पंतप्रधान ट्रूडो यांच्या वक्तव्यामुळे हानी पोहोचली आहे, असेही ते म्हणाले.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जूनमध्ये निज्जरच्या हत्येत भारत सरकारच्या एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर भारताने तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. भारताने हे आरोप फेटाळले होते. या प्रकरणाच्या तपासात मदत करण्यासाठी आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले.