आता प्रदुषण होत नाही का? समुद्रात कचरा फेकणाऱ्यांबद्दल Xवर संताप

    21-Nov-2023
Total Views | 36
 Session Idle | Logged At: 14:43:10 | Current Organisation: MTB-MTH Welcome Rohit Dashboard Contents Room Publish Room Media Room Page Builder Logout ALL ARTICLESURL PREVIEWPREVIEW SAVE & PUBLISH SEO Basic Score: 80% SEO Advance Score: 40% News Source: Select Author Show Author Show Author in News News Date: 11/21/2023 4:58:41 PM News Expiry Date: 8/17/2026 4:58:41 PM SEO Focused Keyword: मुंबई English News URL (Max Length 199 characters): Twitter post About the man Throw trash in ocaen News Title: आ

मुंबई :
मुंबई शहरातील वाढत्या वायू प्रदुषणामुळे महापालिका प्रशासन सतर्क असून सरकार पातळीवर नवनवीन उपाययोजना राबविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. दरम्यान, पालिका प्रशासन वायू प्रदुषणाबाबत उपाययोजना करण्यात व्यस्त असताना एका व्यक्तीने X वर पोस्ट करत आणखी नवा एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे.

दरम्यान, X वर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओत मुस्लिम व्यक्तीकडून समुद्रात दोन-तीन पिशव्या भरून निर्माल्य टाकताना दिसत आहे. यासंदर्भात व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने आपला संताप व्यक्त करत मुंबईतील सुज्ञ आणि धर्मनिरपेक्ष नागरिकांना आवाहन करत म्हटले की, समुद्रात कचरा टाकल्यामुळे पर्यावरण दूषित होणार नाही का? आता कुठे आहेत पर्यावरणवादी? केवळ फटाक्यांमुळेच पर्यावरण दूषित होते का? असा रोकडा सवाल या व्यक्तीने विचारला आहे.

विशेष म्हणजे या व्यक्तीने X वर पोस्ट करताना मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस प्रशासनास यावेळी टॅग केल्याचे पाहायला मिळाले.
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121