प्रलोभनातून बाहेर यायचे म्हटले, तर तणाव जरूर टाळा. कारण, तणावामुळे तुमची आत्मनियंत्रण संसाधने त्वरित दुबळी होतात. तणावाचा सामना करण्याचे अनेक मार्ग आहेत. योग किंवा ताईचीसारख्या दैनंदिन पद्धती वापरून तुम्ही पाहू शकता. ध्यान केल्याने अनेकांना आराम मिळतो.
आपल्यापैकी बरेच जण सत्यवादी, प्रामाणिक, दयाळू आणि निष्पक्ष असल्याचे सिद्ध करण्याच्या आशेने, सर्वोत्तम हेतूने जीवनात बरेच समायोजन करीत असतो. परंतु, प्रलोभने ही सर्वत्र आहेत आणि ती चारही दिशांमध्ये विखुरलेली आहेत. म्हणूनच अचानक उद्भणार्या कोणत्याही संकटसमयी एखाद्याचा सर्वोत्तम हेतूदेखील डळमळीत होऊ शकतो. जेव्हा तुम्हाला माहित असते की, तुम्ही खोटे बोलू शकता, तेव्हा प्रामाणिक राहणे हे तसे कठीणच. जेव्हा तुमची मुले खोडसाळपणाचे टोक गाठतात, तेव्हा त्यांच्याशी दयाळूपणे वागणे कठीण असते आणि जेव्हा तुम्ही दिवसभर न खातापिता उपाशी राहता, तेव्हा फक्त तुमच्यापुरता अन्नाचा हिस्सा घेऊन शांत बसणेही कठीणच. जरी आपण नेहमी आपल्या इच्छेनुसार यशस्वी होत नसलो तरीही संयम आणि आत्मनियंत्रण या गोष्टी माणसासाठी आवश्यक आहेत. खर्या अर्थाने मोठे होण्याचा एक भाग म्हणजे, प्रलोभनाचा प्रतिकार करणे हा होय. योग्य गोष्ट करण्यासाठी, इतरांची सेवा करण्यासाठी किंवा दीर्घकालीन वैयक्तिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संयम व आत्मनियंत्रण शिकणे केव्हाही महत्त्वाचे ठरते.
आत्मनियंत्रण हे नेहमीच स्तुत्य नसते. जेव्हा ते इतर सकारात्मक चारित्र्य वैशिष्ट्यांसह माणसाला एकत्रित करता येत नाही, तेव्हा आत्मनियंत्रण पुढील उद्दिष्टांसाठी आणि मोहिमेसाठी वापरले जाऊ शकते. अगदी सर्हाईत गुन्हेगारसुद्धा त्यांच्या घृणास्पद योजना पार पाडण्यासाठी संयम आणि सोशिकपणाचा खुबीने वापर करतात. अर्थात, सर्वसामान्यपणे आपण सर्व काही नियंत्रणात आणणे आवश्यक नाही. हलक्या-मोकळ्या वेळेत सहलीला जाऊन मित्रांसोबत गप्पाटप्पा मारणे, थंडगार पदार्थांचे सेवन करणे किंवा थोडा वेळ मजामस्ती करणे, या तशा निरुपद्रवी प्रथा आहेत.
आपल्याकडे पुरेशी स्वयंशिस्त नसेल, तेव्हा प्रलोभनांमध्ये गुंतण्याच्या या वाईट सवयी मोडणे आणि स्वतःला तसे सांगण्याची सवय लावणे आवश्यक आहे. अल्पकालीन मोहक परिणाम दीर्घकालीन परिणामांचे समर्थन करु शकतात का? जर या प्रश्नाचे उत्तर ’नाही’ असेल, तर कडाडून त्या मोहाचा (व्यसनाचा) विरोध करा. या प्रलोभनांना बळी पडल्याने तुम्हाला फायदा होईल, या वैचारिक क्षणभंगुर विश्वासाला बळी पडू नका. कारण, अल्प उपभोग भोगल्यानंतर तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला कायमच पश्चाताप होईल. जर तुम्ही खरोखरच शारीरिक किंवा मानसिकरित्या प्रतिकार करू शकत नसाल, तर तुम्ही स्वतःला त्या व्यसनासारख्या मोहात लाडवल्यानंतर थोडा गांभीर्याने विचार करा आणि स्वतःला विचारा - ते खरोखरच योग्य होते का? स्वयंशिस्त ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे.
प्रलोभन हे तसे पाहिले, तर सर्व आत्मनियंत्रणाबद्दल असते आणि मोहक व प्रलोभनाची परिस्थिती बरेचदा त्वरित मिळणार्या समाधान आणि दीर्घकालीन उद्दिष्टे यांच्यातील संघर्षाविषयी असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही शिस्तबद्ध आहार घेत असाल, तर तुम्हाला चीझकेकचा स्वादिष्ट तुकडा खाण्याचा मोह अनेकदा होऊ शकतो, जो एकप्रकारे तुमच्यासाठी एक दैनंदिन इशाराच म्हणता येईल. प्रलोभनाला बळी पडून आणि चीझकेक खाल्ल्याने तुम्हाला त्वरित समाधान मिळेल. परंतु, जास्त साखरेचे पदार्थ टाळून अधिक सुदृढ आणि निरोगी होण्याच्या तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टात कायमसाठी व्यत्यय आणेल.
दुसरे उदाहरण म्हणून तुम्ही आधीच वैवाहिक व जवळच्या नातेसंबंधात असल्यास, तुमची फसवणूक करण्यास प्रवृत्त करणार्या लोकांबद्दल जागरूक व्हा. जेव्हा जेव्हा मोहात पडाल, तेव्हा तेव्हा आयुष्यातील तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या जीवनात होऊ शकणार्या दीर्घकालीन परिणामांचा विचार करा. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खरोखर हवीच असेल, तेव्हा त्वरित मिळणार्या माधानाचा विचार करणे सहज सोपे आहे. पण, त्या प्रलोभनाला बळी पडण्यापूर्वी दीर्घकालीन परिणामांचा विचार करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी जरुर घ्या. काही सामाजिक प्रकरणांमध्ये, जसे की जोडीदाराची फसवणूक करण्याचे दीर्घकालीन परिणाम व्यापक आणि अनेकदा अत्यंत तीव्र व दुःखदायी असतात.
तुम्ही तुमच्या जोडीदाराला दुखवाल, तुम्ही त्या व्यक्तीच्या तुमच्यावरील विश्वासाला तडा जाऊ दिलात, तर तुमचे नातेसंबंधही तुटू शकतात. तथापि, संशोधक ज्याला ‘एप्सिलॉन किमतीची प्रलोभने’ म्हणतात. कारण, या छोट्या मोहक गोष्टी, ज्या स्वतःहून परिणामकारक वाटत नाहीत, परंतु त्यामुळे काही व्यक्तींच्या आयुष्यात लक्षणीय परिणाम झालेले पाहायला मिळतात. त्यांच्या जीवनाचे होत्याचे नव्हते होते. बर्याच लोकांना या प्रलोभनांना नकार देणेही अनेकदा कठीण जाते. कारण, वाटायला या गोष्टी खूप किरकोळ वाटतात. विवाहबाह्य प्रेमात थोडीशी मजा जाणवते, पण आपण त्यात असे काही अडकून जाऊ की मग बाहेर येणे मुश्किल होईल, असे कोणालाही सहज वाटत नाही.
आयुष्यातील काही गोष्टी खरोखरीच अनमोल आणि महत्त्वाच्या असतात. तेव्हा स्वत:ला पर्यायच देऊ नका. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा मोह झाला असेल, तर तुमच्याकडे तो टाळण्याचा पर्याय आहे, यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही त्या परिस्थितीतून मोह स्वीकारण्याची निवड काढून टाकल्यास, तुम्हाला जे काही मोहात पाडत असेल, ते तुम्हाला नाकारावेच लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फसवणूक करण्याचा मोह वाटत असेल, तर तुम्हाला स्वारस्य असलेल्या सहकार्यासोबत फ्लर्टिंग करणे टाळा. तुम्हाला फसवणूक करायची नाही, हे माहीत असल्याने, सहकार्यांमध्ये स्वारस्य असल्यासारखे अजिबात वागू नका. जर तुम्हाला एखादी गोष्ट टाळायचा मोह वाटत असेल, जर तुम्हाला जास्त व्यायाम करायचा असेल, पण त्रासदायक वाटत असेल, तर तुमच्या मित्राला आव्हान द्या की, चला आपण बघू की, कोण जास्त वजन कमी करू शकतं किंवा जिममध्ये कोण जास्त वेळ घालवू शकतो. तुम्हाला (आणि इतरांना) जबाबदार बनवण्यासाठी तुमचे इतर काही स्नेही तुमचे स्पर्धक बनून तुम्हाला लोभापासून दूर नेऊ शकतात.
प्रलोभनातून बाहेर यायचे म्हटले, तर तणाव जरूर टाळा. कारण, तणावामुळे तुमची आत्मनियंत्रण संसाधने त्वरित दुबळी होतात. तणावाचा सामना करण्याचे अनेक मार्ग आहेत. योग किंवा ताईचीसारख्या दैनंदिन पद्धती वापरून तुम्ही पाहू शकता. ध्यान केल्याने अनेकांना आराम मिळतो.खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम उपयुक्त ठरू शकतात आणि तुम्ही ते कुठेही, कधीही करू शकता. पुरेशी विश्रांती घ्या. रात्री किमान सात ते नऊ तास झोपा आणि आठवड्याच्या शेवटीही झोपेचा नित्यक्रम ठेवा.