प्रेरणा रास : एक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ

    05-Oct-2022
Total Views | 34
रास प्रेरणा
‘युवक प्रेरणा फाऊंडेशन’ची स्थापना १५ वर्षांपूर्वी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या पुढाकाराने झाली. मुलुंड येथील कालिदास नाट्यसंकुलातील भव्य पटांगणात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येऊ लागला. या उत्सवामध्ये सामाजिक भान राखत सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांचा सन्मान करण्यात आला. त्यातील सामाजिकता इथे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
भव्य प्रमाणात साजर्‍या होणार्‍या या महोत्सवाची कीर्ती सर्व मुंबईभर पसरली. मुलुंड येथे गरबा खेळण्यासाठी व देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबईभरातून व ठाणे, नवी मुंबईतून नागरिक येऊ लागले. अनेक वर्षे ही परंपरा चालू होती. यात खंड पडला तो कोरोना ‘लॉकडाऊन’मुळे. गेली दोन वर्षे हा उत्सव साजरा करता आला नाही.
 
 
या वर्षी खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या साहाय्याने ’भव्य प्रेरणा रास २०२२’ चे आयोजन करण्यात आले. सुमारे १०० स्वयंसेवक या कार्यक्रमाच्या आयोजनात गुंतले होते. भव्य ‘सेट’ उभारून त्यावर सुंदर प्रकाशयोजना करण्यात आली होती. संपूर्ण मैदानात ‘रेड कार्पेट’ अंथरण्यात आले होते. गरबा रास खेळण्यासाठी प्रशस्त मैदान उपलब्ध होते, तर अतिथींसाठी छान आसनव्यवस्था करण्यात आली होती.
 
 
प्रत्येक स्वयंसेवक आपापल्या विभागाची व्यवस्था चोखपणे पाहत होता. सुमधुर वाद्यवृंद आयोजित करण्यात आला होता. ढोलिडा फेम पार्श्वगायिका जान्हवी श्रीमनकर, सुफी गायक भावीन शास्त्री, शरद लष्करी, पोमला शहा आणि सागर गडा यांनी प्रेरणा रासमध्ये नवचैतन्य निर्माण केले. हजारो नागरिक एकत्र येऊन भक्तीभावे देवीचे दर्शन घेत होते व रासलीलेचा मनमुराद आनंद घेत होते. वाद्यवृंदाचा ठेका सर्वांना डोलायला लावत होता. रोज मोठ्या संख्येने लोक या आनंदोत्सवात भाग घेत होते. समाजातील सर्वच स्तरांतील लोकांचा यात उत्स्फूर्त सहभाग होतो. अनेक निमंत्रितांचा खा. मनोज कोटक यांच्या हस्ते ’प्रेरणा रास’चा स्कार्फ देऊन सन्मान करण्यात आला. साहित्यिक, कलाकार, लेखक, निवृत्त सरकारी अधिकारी, वरिष्ठ पत्रकार, तेलुगू कन्नड सेवा संघम, संत शिरोमणि रोहिदास महाराज मित्र मंडळ, दलित अत्याचार विरोधी मंच, सक्षम महिला मंडळ इत्यादी अनेक संस्थांचे पदाधिकारी, गटई कामगार यांचा सन्मान करण्यात आला.
 
 
शास्त्रीय गायिका विभावरी बांधावकर, अनिता जितुरी, पत्रकार विलास परुळेकर, योगिता साळवी, मीनाक्षी खोसला, ‘संस्कार भारती’च्या माधुरी शेंबेकर, राष्ट्रसेविका दलाचा स्वयंसेविका, विक्रोळीतील स्वयम् महिला मंडळच्या मंजू यादव, सीमा चौहान, वनिता चौहान, सपना धारा, मिता सावंत, ज्योती जक्का, सत्तरी ओलांडलेले सॅम्युअल लुईस आणि त्यांच्या पत्नी सुलभा, अशोक गांगुर्डे, विष्णू रोकडे, गणेश तेलोरे, दिलीप वडजे, चंपालाल आगारे आणि सीताराम बेनरवाल यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय समाजातील अनेक मान्यवर व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते.
 
 
‘प्रेरणा रास’ म्हणजे एक सामाजिक आणि सांस्कृतिक मेळावा होता. रोज रासगरबा स्पर्धा ठेवण्यात येत होती. उत्कृष्ट नृत्यकौशल्य असणार्‍या नागरिकांना खासदारांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पारंपरिक वेषभूषेतील लहान मुलांची स्पर्धा हे ‘प्रेरणा रास’चे खास आकर्षण होते.भव्य ’सेट’, उत्कृष्ट वाद्यवृंद, चैतन्यमय भारावलेले वातावरण यामुळे ‘प्रेरणा रास उत्सव २०२२’ सर्व अर्थाने संस्मरणीय झाला. उत्कृष्ट आयोजनाबद्दल खा. मनोज कोटक आणि ‘युवक प्रेरणा फाऊंडेशन’च्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
 
डॉ. श्वेता शेजवळ 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121